श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासद अपघाती विमा चेक प्रदान

Jul 29, 2026 - 21:49
 0  3
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासद अपघाती विमा चेक प्रदान

शिरोळ : प्रतिनिधी

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते. कारखान्याच्या सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघात विमा पॉलिसी घेतली आहे. दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा सर्व अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी दोन डोळे किंवा दोन हातपाय निकामी झाले तर एक लाख रुपये आणि एक डोळा किंवा एक हातपाय निकामी झाल्यास 50 हजार रुपये इतकी विम्याची रक्कम पॉलिसीमुळे मिळते. सदर विमा पॉलिसी न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड इचलकरंजी यांचेकडून धारण केलेली आहे. याच पॉलिसी अंतर्गत महापुरामध्ये अपघाती मयत झालेले 1) इकबाल बाबासो बैरागदार अकिवाट यांचे वारस 2) अरुण बंडू सावंत राजापूर यांचे वारस 3) बाबासो कोळी तिळवणी 4) शिवगोंडा भीमा मगदूम ( खरोसे) दत्तवाड यांचे वारस 5) बळवंत आनंत कुलकर्णी इंगळी 6) बाबासो बाबाजी कोळेकर कारदगा यांचे वारस 7) महादेव पिरगोंडा केरीपाळे घरणगुत्ती (मोटर सायकल पडून जखमी झाल्यामुळे 343 दिवस कामावर नसल्यामुळे एक लाख 46 हजार 571 रुपयाचा चेक देण्यात आला.तसेच अरुण बंडू सावंत यांना दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेच्याकडून दोन लाख रुपये दिले आहे तर सभासदाच्या वारसांना 13 लाख 96 हजार 571 रुपये विमापॉलिसीचे चेक प्रदान करण्यात आला. आज अखेर मयत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये प्रमाणे 110 सभासदांच्या वारसांना एक कोटी 19 लाख 96 हजार 571 रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली.

सदरचा चेक प्रधान कार्यक्रमात दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील दादा, चेअरमन रघुनाथ पाटील ,ज्येष्ठ संचालक,श्री इंद्रजीत पाटील, बाळासाहेब पाटील (हलसवडे),प्रमोद पाटील ,शेखर पाटील, रणजीत कदम संचालक तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई ,सेक्रेटरी अशोक शिंदे, संजय भोसले मॅनेजर फायनान्स,विमा सल्लागार एकनाथ अंबाजी पाटील व दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर शहापुरे सेक्रेटरी महेश परीट उपस्थित होते. यावेळी विमा प्रतिनिधी ऋषिकेश पाटील व इतर मान्यवर संचालकांच्या उपस्थितीत चेक प्रदान करण्यात आले.

  या कामात कोल्हापूरचे क्लेम मॅनेजर वसंत कोल्हे ,पुण्याचे रिजनल मॅनेजर प्रेमचंद मोरे, उप महाप्रबंधक एच.बी.अरुण कुमार डीजीएम पुणे प्रादेशिक कार्यालय, वरिष्ठ सहाय्यक रश्मी पिसाळ कोल्हापूर ,मृणाल उरुणकर ,, राधिका पाटील सहाय्यक,, ब्रँच मॅनेजर रोहन खाडीलकर असिस्टंट मॅनेजर शितल मोहिते,प्रशासकीय अधिकारी श्रीराज सिद्धार्थ, मॅनेजर वनिता कुंभार, शुभम कदम सहाय्यक असिस्टंट,नितीन पाटील सहाय्यक यांचे विशेष सहकार्य मिळाले.तसेच कारखान्याचे व शेअर विभागाचे परवेज मेस्त्री,सब अकाउंट अमृता चौगुले (खोत) इत्यादी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0