डॉ.जे.जे.मगदूममध्ये बी.फार्मसी प्रवेशासाठी सुविधा केंद्र सुरू

Aug 11, 2026 - 17:25
 0  3
डॉ.जे.जे.मगदूममध्ये बी.फार्मसी प्रवेशासाठी सुविधा केंद्र सुरू

जयसिंगपूर : प्रतिनिधी 

येथील डॉ.जे.जे.मगदूम फार्मसी कॉलेज या महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष बी.फार्मसी व थेट द्वितीय वर्ष बी.फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्र म्हणून मान्यता मिळाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शितलकुमार पाटील यांनी दिली.

बी.फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी,अर्ज भरणे,आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तसेच प्रवेश प्रक्रियेबाबत संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाविद्यालयाने प्रशिक्षित समन्वयकांची विशेष टीम नियुक्त केली असून प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. महाविद्यालय परिसरात इंटरनेट, वाय-फाय, झेरॉक्स तसेच एटीएम यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

कोल्हापूर, सांगली तसेच परिसरातील प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुविधा केंद्राचा लाभ घेऊन आपली प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. शितलकुमार पाटील यांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0