डॉ.जे.जे.मगदूम फार्मसी महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष मान्यता : प्राचार्य शीतलकुमार पाटील यांची माहिती

Jul 3, 2026 - 19:22
 0  9
डॉ.जे.जे.मगदूम फार्मसी महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष  मान्यता : प्राचार्य शीतलकुमार पाटील यांची माहिती

जयसिंगपूर : प्रतिनिधी

येथील डॉ.जे.जे.मगदूम फार्मसी कॉलेजला डी.फार्मसी प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ साठी सुविधा केंद्रासाठी महाराष्ट्र शासनाच्या तंत्र शिक्षण संचालनालय कडून मान्यता मिळाली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शितलकुमार पाटील यांनी दिली. २०२६-२७ मध्ये होणाऱ्या प्रथम वर्ष डी. फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयाला सुविधा केंद्राची मान्यता मिळाली आहे. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना या केंद्रातून आपले नाव नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन आणि कागदपत्रांची छाननी करता येणार आहे असेही ते म्हणाले. 

महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मार्गदर्शन करणे, इंटरनेटद्वारे फार्म भरणे यासाठी एका विशिष्ट टीमची योजना करण्यात आलेली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे अवाहन महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कॉलेज परिसरामध्ये एटीएम, वायफाय तसेच झेरॉक्सची सुविधा उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी सोयीचे होणार आहे. तरी उपलब्ध सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही प्राचार्य डॉ. शितलकुमार पाटील यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0