अनुसूचित जाती उपवर्गीकरणास रिपाई आठवले गटाचा विरोध : 27 जुलै रोजी राज्यभर आंदोलन

जात निहाय जनगणना होत नाही तोपर्यंत उपवर्गीकरण करू नये अशी मागणी

Jul 4, 2026 - 17:45
 0  8
अनुसूचित जाती उपवर्गीकरणास रिपाई आठवले गटाचा  विरोध : 27 जुलै रोजी राज्यभर आंदोलन
अनुसूचित जाती उपवर्गीकरणास रिपाई आठवले गटाचा  विरोध : 27 जुलै रोजी राज्यभर आंदोलन

कोल्हापूर : प्रतिनिधी 

अनुसुचीत जातीमधील उपवर्गीकरण जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत करु नये. जातनिहाय जनगणना होण्याआधी उपवर्गीकरण करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा उपवर्गीरणाला पहिल्या पासुन स्पष्ट विरोध आहे. असा सज्जन इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री ना रामदास आठवले यांनी दिला. 

 कोल्हापूर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीस मार्गदर्शन करताना त्यांनी आघाडी सरकारला हा इशारा दिला. याबाबत जनजागृती आणि समर्थन मिळवण्यासाठी संपूर्ण राज्यभर समाज परिवर्तन मार्च सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली. तर येत्या 27 जुलै रोजी रिपब्लिकन पक्षा तर्फे राज्यभरात सर्व जिल्हा, तालुका स्तरावर उपवर्गीकरणाविरोधात आंदोलन करुन उपवर्गीकरणाचा विरोध करावा. असा ठराव रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारणी बैठकीत मंजुर झाल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी दिली. यावेळी अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे स्वागत अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0