डॉ.जे.जे.मगदूम महाविद्यालयाच्या तिघांना स्पेक्ट्रा सिस्टीम कंपनीमध्ये मिळाली संधी
जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील डॉ.जे.जे.मगदूम इंजीनियरिंग कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांची इंडो व्हान्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे व स्पेक्ट्रा सिस्टम्स कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली असून इंडोव्हान्स ही अभियांत्रिकी डिझाईन व CAD सेवा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. जागतिक स्तरावरील क्लाऊड तंत्रज्ञान व सोल्युशन मध्ये काम करणारी स्पेक्ट्रा सिस्टम ही कंपनी आहे.
बांधकाम व्यवसायिक व नवीन तंत्रज्ञानामध्ये काम करत असणाऱ्या कंपन्यांशी महाविद्यालयाचा करार असून कौशल्य विकासासाठी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी एक विशेष ट्रेनिंग घेतले जाते. त्यामुळेच विद्यार्थ्यांची चांगल्या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड होते अशी माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर सौरभ खानावळे यांनी दिली.कु.आदर्श पाटील, सानिया शेख (सिव्हिल) व सार्थक वाळके ( आय. टी.) अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम, कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे व प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यशवंतांना विभाग प्रमुख व प्राध्यापकांचे यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लागले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0