गोकुळ दूध संघाच्या रक्तदान शिबिरात 400 रक्तदात्यांनी कर्तव्य बजावले

1 मे कामगार दिनानिमित्त संघाचा उपक्रम

May 8, 2026 - 18:42
May 8, 2026 - 18:47
 0  4
गोकुळ दूध संघाच्या रक्तदान शिबिरात 400 रक्तदात्यांनी कर्तव्य बजावले
गोकुळ दूध संघाच्या रक्तदान शिबिरात 400 रक्तदात्यांनी कर्तव्य बजावले
गोकुळ दूध संघाच्या रक्तदान शिबिरात 400 रक्तदात्यांनी कर्तव्य बजावले

 कोल्हापूर : प्रतिनिधी 

   जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ ने नुकत्याच झालेल्या कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल 400 रक्तदात्यांनी आपले पवित्र कर्तव्य बजावून पुण्य कमावले. महाराष्ट्र दिन ही सालाबाद प्रमाणे यंदा उत्साहात साजरा करण्यात आला. गोकुळ प्रकल्प परिसरात झालेल्या या कार्यक्रमात कामगार, कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

      प्रारंभी प्रमुख पाहुणे कॉ. संजय सदलगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी महाराष्ट्र राज्यगीत व राष्ट्रगीत सादर करून कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचा गौरव केला. औचित्याने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी संघटना (आयटक) यांच्या वतीने महालक्ष्मी ब्लड बँक, कागल व कोल्हापूर यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. गोकुळ प्रकल्पात आयोजित या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये तब्बल ४०० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. 

    शिबिराचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. “रक्तदान ही एक जनसेवाच आहे. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळते. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून समाजासाठी प्रेरणादायी आहे.” असे प्रतिपादन या वेळेला चेअरमन नवीन मुस्लिम यांनी केले. तसेच त्यांनी गोकुळ कर्मचारी संघटनेने सातत्याने सामाजिक जाणीव जपत असे उपक्रम राबविल्याबद्दल संघटनेचे विशेष कौतुक केले. 

     कामगार दिनानिमित्त केवळ औपचारिक कार्यक्रम न करता समाजोपयोगी कार्य करण्याची परंपरा जपल्याचे त्यांनी नमूद केले. या शिबिरात आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी, मार्व्हलस कंपनी, टूलेक्स कंपनी, कृषी संघ, लक्ष्मी लाडा कंपनी तसेच एमआयडीसी परिसरातील विविध उद्योगांतील कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. युवक वर्गानेही उत्साहाने रक्तदान करून उपक्रम यशस्वी केला. शिबिरातील सर्व रक्तदात्यांना कर्मचारी संघटनेच्या वतीने जॅकेट भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. रक्तदात्यांसाठी उत्तम नियोजन, वैद्यकीय तपासणी, अल्पोपहार व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

याप्रसंगी ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, जनरल सेक्रेटरी कॉ.सदाशिव निकम, अध्यक्ष कॉ.मल्हार पाटील, कॉ.दिलीप पोवार, कॉ.शंकर पाटील, कॉ.व्ही.डी.पाटील, कॉ.लक्ष्मण पाटील, कॉ.दत्ता बच्चे, कॉ.संभाजी शेलार, कॉ.संदेश पाटील, कॉ.योगेश चव्हाण, कॉ.कृष्णा चौगले, कॉ.अजित जाधव व संघटनेचे अधिकारी पदाधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0