शरद आयर्वेद मेडिकल कॉलेजमार्फत नांदणीत आरोग्यसेवा

शांतिसागर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त : ४०० हून अधिक रुग्णांना मोफत उपचार

Sep 18, 2026 - 18:19
 0  3
शरद आयर्वेद मेडिकल कॉलेजमार्फत नांदणीत आरोग्यसेवा
यड्राव : येथे शरद आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये शिबाराचा शुभारंभ करताना अनिल बागणे, डॉ. प्रमोद कणप आदी.
शरद आयर्वेद मेडिकल कॉलेजमार्फत नांदणीत आरोग्यसेवा

यड्राव : प्रतिनिधी

 येथील शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत प्रथमाचार्य श्री १०८ शांतिसागर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नांदणी येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ४०० हून अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, विविध रक्त तपासण्या, व्हायरल इन्फेक्शन, अशक्तपणा आदी आजारांची तपासणी करण्यात आली. महिलांच्या विविध आरोग्यविषयक तक्रारी, लहान मुलांचे आजार तसेच हाडांशी संबंधित विकारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात आले. आयुर्वेदातील पंचकर्म उपचारपद्धतीबाबतही रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले.

ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा सहज उपलब्ध व्हावी, आर्थिक अडचणीमुळे आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष होऊ नये आणि आजारांचे वेळेत निदान व्हावे, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले. रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांच्या आजारानुसार औषधोपचार, आहार-विहार तसेच पुढील उपचारांबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

संस्थेचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर झाले. प्राचार्य डॉ. प्रमोद कनप, डॉ. माधुरी रोड्ड, डॉ. पूनम देबाजे, डॉ. वैभव माने, डॉ. विनया शेट्टी यांच्यासह २० तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने दिवसभर रुग्णांची तपासणी व उपचार केले. विविध आजारांची एकाच ठिकाणी तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी शिबिराचे स्वागत केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0