श्री दत्त नागरी पत संस्थेच्या ठेवीत ६ कोटींनी वाढ - माधवराव घाटगे

५१ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

Sep 19, 2026 - 21:24
 0  49
श्री दत्त नागरी पत संस्थेच्या ठेवीत ६ कोटींनी वाढ - माधवराव घाटगे

जयसिंगपूर : प्रतिनिधी

सभासद, ठेवीदार हाच संस्थेचा आर्थिक कणा असून त्यांच्याच पाठबळावर श्री दत्त नागरी सहकारी पत संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. सभासदांची विश्वाहर्ता हीच दत्त नागरी पत संस्थेची ओळख असून संचालक मंडळाने पारदर्शी कारभार करून सन २०२५ - २६ या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीत ६ कोटी रुपयांची वाढ झाली असून संस्थेला परत सोन्याचे दिवस येत आहेत असा विश्वास श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी व्यक्त केला. 

श्री दत्त नागरी सहकारी पत संस्थेची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कल्पवृक्ष गार्डन येथे पार पडली. त्याप्रंसगी श्री.घाटगे बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने- देशमुख यांनी केले. जनरल मॅनेजर राजेंद्र चव्हाण यांनी विषय पत्रिकेचे वाचन केल्यानंतर सर्व सभासदांनी टाळ्याच्या गजरेत सर्व विषय एकमतांने मंजूर केले.

यावेळी बोलताना श्री. घाटगे म्हणाले, दरवर्षी संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत चालला आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ठेवी १०० कोटीवर पोहचल्या आहेत. संस्थेचे सभासद व शेतकरी यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी दत्त नागरी पत संस्था मोलाचा वाटा उचलणार असल्याचा आशावाद यावेळी श्री. घाटगे यांनी व्यक्त केला.

वेस्ट इंडिया शुगर मिल असोशिएशन ( विस्मा ) या संस्थेचा राज्य पातळीवरील सी.एस.आर पुरस्कार श्री गुरुदत्त शुगर्स ला मिळालेबदल चेअरमन माधवराव घाटगे ,एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, धीरज घाटगे यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने -देशमुख व व्हा.चेअरमन धोंडीरम खोत यांच्या हस्ते करण्यात आला . 

यावेळी सभेला गुरुदत्त चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहूल घाटगे,गुरुदत्त शुगर्स चे संचालक शिवाजी सांगले ,कवठेसारचे माजी सरपंच यशवंतराव गुरव, जि.प. चे माजी बांधकाम सभापती महादेव धनवडे , गुंडू दळवी, शिरोळ पं.स चे माजी सदस्य सदाशिव आंबी , शिरोळ चे माजी नगरसेवक श्रीवर्धन माने - देशमुख, जनता दल सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस प्रविणभाई माणगावे, शिरोळ चे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष दिलीपराव माने,दत्त नागरी पत संस्थेचे माजी व्हा.चेअरमन अशोक जगताप,पतंगराव गोधडे, बबन घाटगे, सर्व संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. आभार संचालक विजय कदम यांनी मानले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0