एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालावे - डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर)
जैनापूर शरद कृषित खत उत्पादने उद्घाटन व माहिती पुस्तिका प्रकाशन सोहळा
जयसिंगपूर : प्रतिनिधी
सध्याच्या शेती संकटावर मात करण्यासाठी AI तंत्रज्ञान व सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादनक्षमता वाढविणे गरजेचे आहे. हवामान, माती व जैविक परिस्थितीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना अचूक सल्ला देणारे AI हे शेतीचे प्रभावी मार्गदर्शक ठरत आहे. शरद कारखाना व शरद कृषि महाविद्यालयाकडून शेतक-यांना अल्प दरात (ना नफा-ना तोटा या तत्त्वावर) विविध जैविक व रासायनिक विद्राव्य खते उपलब्ध करून देण्यात येतील. असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. ते जैनापूर येथे शरद कृषि महाविद्यालयात खत उत्पादने उद्घाटन व माहिती पुस्तिका प्रकाशन सोहळावेळी बोलत होते.
यावेळी डॉ. यड्रावकर पुढे म्हणाले, कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून शेतीचा सर्वांगीण विकास करावा. उत्पादन खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढवावी तसेच शरद कृषि महाविद्यालय व शरद सहकारी साखर कारखाना यांच्याकडून शेतक- यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल.
सहकार महर्षी श्री. शामराव पाटील यड्रावकर (आण्णा) यांच्या २२ व्या स्मृतिदिनानिमित्त शरद कृषि महाविद्यालय, जैनापूर येथे खत उत्पादने उद्घाटन व माहिती पुस्तिका प्रकाशन संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) व संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या उपस्थीतीत झाले. या उत्पादनासाठी कृषि विज्ञान संत अंकुश पाटील यांचे सहकार्य लाभले.
शरद साखर कारखान्याचे संचालक, मुख्य कृषि अधिकारी, ऊस विकास अधिकारी व प्रगतशील शेतकरी वर्ग यांनी खत उत्पादने व माहिती पुस्तिका प्रकाशन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशांत पाटील यांनी महाविद्यालयाने तयार केलेल्या विविध खतांबद्दलची माहिती व वापर याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी, शेतकरी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रा. पूजा भोसले यांनी केले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0