डॉ.जे.जे.मगदूम अभियांत्रिकीचा अमेरिकेतील 'कॉन्टम रेडी'सोबत सामंजस्य करार

विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या नव्या संधी

Oct 2, 2026 - 20:17
 0  5
डॉ.जे.जे.मगदूम अभियांत्रिकीचा अमेरिकेतील 'कॉन्टम रेडी'सोबत सामंजस्य करार

जयसिंगपूर : प्रतिनिधी 

     येथील डॉ.जे.जे.मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाने अमेरिकेतील 'कॉन्टॅम रेडी'( फ्लोरिडा )या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख शिक्षणाच्या क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

    या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उदयोन्मुख तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, त्यांचे तांत्रिक ज्ञान व कौशल्ये विकसित करणे तसेच जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलांशी विद्यार्थ्यांना जोडणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे असे प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील यांनी सांगितले 

     बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी सक्षम बनविणे आणि त्यांच्यामध्ये संशोधन, नवकल्पना व उद्योजकतेची वृत्ती विकसित करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर काँटम रेडी(यु.एस.ए.) या परदेशी संस्थेसोबतचा हा करार महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि औद्योगिक सहकार्याच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

        ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हॉइस चेअरपर्सन डॉ.सोनाली मगदूम, ट्रस्टी राजश्री मगदूम, कार्यकारी संचालक डॉ.सुनील आडमुठे यांच्या मार्गदर्शनाखाली' इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन सेल' च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असे आय. आय.सी.सेलचे प्रमुख डॉ. फिरोजअमीन यांनी सांगितले 

         या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींची माहिती मिळण्यास तसेच भविष्यातील तंत्रज्ञानाधारित करिअरसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0