संभाजीपूर येथील शिबिरात २७७ जणांची तपासणी

आरोग्य अभियानात ४ हजार ६९२ नागरिकांनी घेतला सहभाग

Oct 10, 2026 - 12:53
 0  6
संभाजीपूर येथील शिबिरात २७७ जणांची तपासणी

जयसिंगपूर : प्रतिनिधी

सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीपूर येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण २७७ नागरिकांची तपासणी करण्यात आली.

शिबिरात १४० नागरिकांची आरोग्य तपासणी, तर १३७ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिराला अजय पाटील यड्रावकर यांनी भेट दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विविध गावांतील नागरिक या सुविधेचा लाभ घेत आहेत.

संभाजीपूर येथील शिबिरात २७७ नागरिकांची तपासणी झाल्याने आजअखेर या अभियानांतर्गत तपासणी झालेल्या नागरिकांची एकूण संख्या ४ हजार ६९२ झाली आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध होत असून, आरोग्यविषयक जागृतीही निर्माण होत आहे.

यावेळी संभाजी कोळी, अनुराधा कोळी, मालुताई वडर, राजश्री जाधव, प्रसन्न देसाई, निवास वडर, आनंद खाडे, प्रशांत हसुरकर, महावीर पाटील, ग्रामविकास अधिकारी अतुलकुमार कांबळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य विभागाचे पथक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0