शरद पॉलिटेक्ऩिकच्या २४ विद्यार्थ्यांची जीई एरोस्पेस कंपनीत निवड

May 12, 2026 - 15:49
 0  3
शरद पॉलिटेक्ऩिकच्या २४ विद्यार्थ्यांची जीई एरोस्पेस कंपनीत निवड

यड्राव : प्रतिनिधी

 येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्ऩिकच्या २४ विद्यार्थ्यांची पुणे येथील जीई एरोस्पेस कंपनीत निवड झाली आहे. यामध्ये मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल विभागातीव विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 

मेकॅनिकलच्या सोहम नंद्याळकर, श्रीकांत रसले, महबूब अलम, नितीश पासवान, अरिहंत किणींगे, भरत चिंडके, पार्थ पाटील, तक्षक सोनटक्के, अदित्य कोळी, सागर मोहिते, प्राची मल्लाडे, अमनउल्लाह मुजावर, विक्की राठोरे तर इलेक्ट्रीकल विभागातील रोहित माने, रंजन महतो, सुमित शॉ, सतिश गावडे, प्रतिक पाटील, प्रथमेश राजमाने, सारंग पाटील, पियुष पाटील, साक्षी पाटील, सानिका पाटील, नम्रता राठोड या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 

जनरल इलेक्ट्रिक कंपनी हि अमेरिकन कंपनी जीई एरोस्पेस म्हणून व्यवसाय करते. कंपनीचा आढावा: जीई एरोस्पेस ही व्यावसायिक आणि लष्करी विमानांसाठी जेट इंजिन, सुटे भाग आणि एकात्मिक प्रणाली पुरवणारी जगातील एक अग्रगण्य कंपनी आहे. आघाडीच्या विमान कंपन्या, सरकारी संस्था आणि देखभाल, दुरुस्ती आणि दुरुस्ती संस्थांचा एक विश्वासार्ह भागीदार म्हणून कंपनी काम करीत आहे. २०२४ मध्ये जनरल इलेक्ट्रिकच्या अंतिम विभाजनानंतर ही कंपनी एक स्वतंत्र, स्वायत्त सार्वजनिक कंपनी म्हणून कार्यरत आहे. पुणे येथे प्रोडक्शन युनिट आहे. 

महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अॅप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्ऩिकल स्कीलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यु यासह टेक्निकल सेशन, अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तंज्ञामार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना या कॅम्पससाठी झाला. तसेच सध्या इंडस्ट्रीमध्ये मेकॅनिकल व इलेक्ट्रीकलच्या विद्यार्थ्यांना चांगली मागणी असल्याची माहीती ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाने दिली. 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. प्राचार्य बी.एस. ताशीलदार, ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रा. बिपीन पाटील, प्रा. नेहा सोनी, सर्व डिन, विभाग प्रमुख यांचे सहकार्य लाभले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0