पिंटू मगदूम कॉलेजचा सामाजिक उपक्रम
आई वृद्धाश्रमात दिवाळी फराळ वाटप
जयसिंगपूर : प्रतिनिधी
डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्ट संचलित अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज, धरणगुत्तीच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत निमशिरगाव येथील आई वृद्धाश्रमात दिवाळी फराळ वाटप उपक्रम राबविण्यात आला.
दिवाळी हा आनंद, प्रेम आणि आपुलकीचा सण असून हा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा या सामाजिक भावनेतून महाविद्यालयाच्यावतीने हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन निटवे यांच्या मार्गदर्शनाखाली निमशिरगाव येथील आई वृद्धाश्रम येथे भेट देऊन तेथील आजी-आजोबांना दिवाळी फराळाचे वाटप केले. तसेच विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी आपुलकीने संवाद साधून त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस केली.
ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम,व्हॉइस चेअरपर्सन डॉ. ॲड.सोनाली मगदूम व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांच्या सामाजिक जाणिवेतून प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापिका कु.मानसी झाडे यांनी हा उपक्रम पार पाडला. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0