डॉ.जे.जे.मगदूम होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये दंतचिकित्सा उपचार सुरु
जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील डॉ.जे.जे.मगदूम होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या वतीने नवीन दंतचिकित्सा (डेंटल) क्लिनिक उद्घाटन सोहळा पार पडला.उद्घाटन डॉ.शांतीप्रसाद चकोते यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी डॉ.जे.जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम होते.
प्रमुख पाहुणे डॉ. शांतीप्रसाद चकोते यांनी दंत आरोग्याचे महत्त्व नियमित तोंडाची स्वच्छता आणि दंतविकाराची लवकर तपासणी यावर भर दिला. दंतविकाराकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे नियमित दंत तपासणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.मगदूम ट्रस्टचे आरोग्य सेवेतील योगदान आणि ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार व किफायतशीर उपचार करण्याचा उद्देश ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम यांनी अधोरेखित केला.नवीन दंतचिकित्सा क्लीनिक मुळे रुग्णांना चांगली सेवा मिळण्यासोबतच विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षण व प्रशिक्षणाची संधी मिळेल असा विश्वास कार्यकारी संचालक डॉ.सुनील आडमुठे यांनी स्पष्ट केले.
दंत चिकित्सा विभाग सुरू करण्यासाठी ट्रस्टच्या व्हॉइस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम, ट्रस्टी राजश्री मगदूम यांचे प्रोत्साहन लाभले.प्राचार्या डॉ.आरती कोगनोळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सावंत यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ.दिपाली गायकवाड(डेंटिस्ट), डॉ. सुनील बन्ने, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0