शाश्वत दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन : जागतिक दुग्ध दिनानिमित्त उपक्रम

गोकुळ दूध संघामार्फत रुग्णांसह नातेवाईकांना आणि कर्मचाऱ्यांनाही गोकुळ फ्लेवर मिल्क चे वाटप

Jun 2, 2026 - 09:29
 0  22
शाश्वत दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन : जागतिक दुग्ध दिनानिमित्त उपक्रम

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) या संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात असून त्याच अनुषंगाने १ जून जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सी.पी.आर.) येथे रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांना व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मोफत ‘गोकुळ फ्लेव्हर मिल्क’चे वाटप करण्यात आले. गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सागर बलकवडे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. यावेळी छत्रपती शाहू वैद्य.महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, गोकुळचे मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील तसेच गोकुळचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गोकुळच्या वतीने दरवर्षी जागतिक दुग्ध दिनानिमित्त दुधाच्या पोषणमूल्याबद्दल जनजागृती करणे व शाश्वत दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. गोकुळ केवळ दुग्ध व्यवसायापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीही जपत आहे. आरोग्यदायी समाज घडविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील, असे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी मनःपूर्वक स्वागत केले.

गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सागर बलकवडे यांनी दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, हितचिंतक यांना गोकुळ परिवाराच्यावतीने जागतिक दुग्ध दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी गोकुळचे प्राधिकृत अधिकारी यांच्यासह सी.पी.आरचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, उपअधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, गोकुळचे मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, मार्केटिंग अधिकारी लक्ष्‍मण धनवडे, सी.पी.आर. चे डॉ.अपराजित वालावलकर, डॉ. रणजीत जाधव, बंटी सावंत, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, उल्हास पाटील, प्रमोद घोडके, वसंत माळवी, रमेश पाटील, शशिकांत पाटील व संघाचे व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0