वीज तांत्रिकी आणि जोडारी हे औद्योगिक व्यवसाय तंत्रशिक्षण उपलब्ध
राजश्री फाउंडेशन ची माहिती
जयसिंगपूर : प्रतिनिधी-
राजश्री फाऊंडेशन संचलित डॉ. जे. जे. मगदूम आय. टी. आय. जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथे आय. टी. आय. साठी इलेक्ट्रिकल व फिटर हे दोन व्यवसायिक ट्रेड उपलब्ध आहेत. नुकतेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागामार्फात ऑनलाईन आय. टी. आय. मार्गदर्शन केंद्र व प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ झाला आहे. त्यानुसार संस्थेची प्रवेश प्रक्रीया २०२६-२७ साठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरून घेणे व संस्थानिहाय विकल्प व प्रध्यान सादर करणे, यासाठी संस्थेमध्ये विनामूल्य अशा मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
मार्गदर्शन केंद्र आठवड्यातील सातही दिवस कार्यरत असेल. त्यामुळे जयसिंगपूर शहर व परिसरातील दहावी पास किवा बारावी पास / नापास विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्री.विजय मगदूम, उपाध्यक्षा ॲड.डॉ.सौ.सोनाली मगदूम यांच्यासह कार्यकारी संचालक श्री.सुनिल आडमुठे, कॅम्पस डायरेक्ट श्री. संदीप रायण्णावर व प्राचार्य श्री.एस. टी.पांडव यांनी केले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0