डॉ.जे जे.मगदूम महाविद्यालयात करियर संधी मार्गदर्शन मेळावा

विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त

Jun 18, 2026 - 14:14
 0  15
डॉ.जे जे.मगदूम महाविद्यालयात करियर संधी मार्गदर्शन मेळावा

जयसिंगपूर : प्रतिनिधी

उच्च शिक्षणाची योग्य निवड आणि फार्मसी क्षेत्रातील करिअरची विविध संधी या बाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी पालकांना मिळावी या उदात्त हेतूने येथील डॉ. जे. जे. मगदूम फार्मसी महाविद्यालयात येत्या शनिवारी दिनांक 20 रोजी विद्यार्थी आणि पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आला असून माहिती हा कार्यक्रम दि. २० जून रोजी सकाळी ११.०० वाजता होत आहे.या मेळाव्यामध्ये बी.फार्म आणि डी.फार्म प्रवेश प्रक्रिया (CAP Round), फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे तज्ज्ञांकडून निरसन असा संयुक्त कार्यक्रम होत आहे. 

आजच्या स्पर्धात्मक युगात योग्य अभ्यासक्रमाची निवड आणि करिअरचे अचूक नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने महाविद्यालयाच्या वतीने हा उपयुक्त उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थी आणि पालकांना प्रत्यक्ष तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शितलकुमार पाटील यांनी परिसरातील सर्व विद्यार्थी, पालक आणि इच्छुकांनी या मार्गदर्शन मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0