डॉ.मगदूम अभियांत्रिकीमध्ये संजिता मोहपात्रा यांचे मार्गदर्शन
जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील डॉ.जे. जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये टी.पी.सी.क्लबचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन आय.ए.एस.संजिता मोहपात्रा (आयुक्त,महानगरपालिका) व डॉ.नरेशचंद्र काठोले(संचालक मिशन आय.ए.एस.अमरावती कॅम्प) यांच्या हस्ते करण्यात आले.डॉ. जे.जे.मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख उपस्थितीमध्ये ट्रस्टी,राजश्री मगदूम होत्या.
कार्यक्रमांमध्ये संजिता मोहपात्रा यांनी विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात योग्य नियोजन, संवाद कौशल्य, आत्मविश्वास,मुलाखतीची तयारी आणि उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. केवळ गुणांवर अवलंबून न राहता तांत्रिक कौशल्ये विकसित करावीत असे विद्यार्थ्यांना सांगितले. समस्या सोडविण्याची क्षमता आणि सातत्यपूर्ण प्रयत्न मनुष्यास विकसित करतात असे चेअरमन डॉ. विजय मगदूम म्हणाले.
संजिता मोहपात्रा यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना रोजगार क्षमतेसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्याची जाणीव होऊन स्पर्धात्मक वातावरण, सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास ट्रस्टी राजश्री मगदूम यांनी व्यक्त केला. महाविद्यालयातील विविध क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळते असे मत प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक स्वरूप .
कार्यक्रमासाठी चेअरमन डॉ.विजय मगदूम,व्हॉइस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम, कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे यांचे प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सौरभ खानावळे (टी.पी.ओ.) यांनी केले, आभार प्रा. सुप्रिया चौगुले यांनी मांनले. कार्यक्रमासाठी प्र.प्राचार्य पी. पी.पाटील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0