शरद इन्स्टिट्युटच्या १२ विद्यार्थ्यांची विविध कंपनीत निवड

Jun 25, 2026 - 18:37
 0  2
शरद इन्स्टिट्युटच्या १२ विद्यार्थ्यांची विविध कंपनीत निवड

यड्राव : प्रतिनिधी

 येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या बारा विद्यार्थ्यांची करमतारा इंजिनिअरिंग लि., आयआरटीआय रोबोटीक्स, व टीई कनेक्टीव्हीटी या नामांकित कंपनीत निवड झाली. महाविद्यालयातील अॅटोमेशन अॅण्ड रोबोटीक्स, मेकॅट्रॉनिक्स व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली.

करमतारा इंजिनिअरिंग लि. कंपनीत प्रतिक जाधव, दिव्या सुतार, निखिल पुजारी, स्नेहल चव्हाण, आसावरी माने, रजत मधाळे, अकिल मुजावर आयआरटीआय रोबोटीक्स कंपनीत रोहण चव्हाण, रोहित कुंभार, सिध्देश संगर, प्रतिक जाधव, तर टीई कनेक्टीव्हीटी कंपनीत दिक्षा तोवर ह्या विद्यार्थ्यांची निवड झाली.

करमतारा इंजिनिअरिंग लिमिटेड ही सौर ऊर्जा व वीज प्रसारण क्षेत्रातील अग्रगण्य भारतीय कंपनी असून देशातील सौर माउंटिंग स्ट्रक्चर्स आणि ट्रॅकर घटकांच्या उत्पादनात मोठा वाटा उचलत आहे. कंपनीच्या भारत व इटलीतील आठ उत्पादन युनिट्समधून विविध ऊर्जा प्रकल्पांसाठी आवश्यक संरचना, टॉवर्स, फास्टनर्स आणि हार्डवेअर फिटिंग्जचे उत्पादन केले जाते. 

आयआरटीआय रोबोटीक्स ही औद्योगिक रोबोटिक्स व ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य भारतीय कंपनी असून स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, रोबोटिक्स इंटिग्रेशन आणि इंडस्ट्री ४.० तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन क्षेत्रात कार्य आहे. भारतासह १० हून अधिक देशांमध्ये सेवा विस्तारला आहे. 

टीई कनेक्टीव्हीटी कंपनी कनेक्टिव्हिटी आणि सेन्सर तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक अग्रगण्य कंपनी असून इलेक्ट्रिक वाहने, औद्योगिक ऑटोमेशन, रोबोटिक्स, डेटा सेंटर्स आणि नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक घटक विकसित करते. १३० हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. 

महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट अंतर्गत ग्रुप डिसक्शन, इंटरव्ह्यु टेक्नीक्सचा सराव, पर्सनॅलिटी डेव्हलेपमेंट, इंटरपर्सनल स्किल्स, मॉक इंटरव्हयु यांची तयारी करुन घेतली जाते. तसेच कंपनीपूरक प्रशिक्षण दिले जाते त्याचा फायदा विद्यार्थ्यांना या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी झाला. 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0