रोटरी क्लब जयसिंगपूरच्या अध्यक्ष पदी रोटे गौतम झेले तर सचिवपदी रोटे असिफ पटेल यांची निवड

15 जुलै रोजी कै.सोनाबाई इंगळे सभागृहात 63 वा पदग्रहण सोहळा

Jul 11, 2026 - 19:18
 0  94
रोटरी क्लब जयसिंगपूरच्या अध्यक्ष पदी रोटे गौतम झेले तर  सचिवपदी रोटे असिफ पटेल यांची निवड
रोटरी क्लब जयसिंगपूरच्या अध्यक्ष पदी रोटे गौतम झेले तर  सचिवपदी रोटे असिफ पटेल यांची निवड
रोटरी क्लब जयसिंगपूरच्या अध्यक्ष पदी रोटे गौतम झेले तर  सचिवपदी रोटे असिफ पटेल यांची निवड

जयसिंगपूर : प्रतिनिधी 

शहरातील अग्रगण्य सामाजिक संस्था रोटरी क्लब जयसिंगपूरच्या 63 व्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, सन 2026-27 या वर्षासाठी रोटे.गौतम राजेंद्र झेले यांची अध्यक्षपदी, रोटे. असिफ नासिरखान पटेल यांची सचिवपदी आणि रोटे. सुमित सुरेश पाटील यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. या सोहळ्याची माहिती पत्रकार परिषदेत मावळते अध्यक्ष रोटे. सुदर्शन एडवान व सचिव रोटे. कोमल पात्रो यांनी दिली.

15 जुलै रोजी येथील कै. सोनाबाई इंगळे सभागृहात होणाऱ्या या सोहळ्यास पदग्रहण अधिकारी म्हणून रोटरी क्लब पनवेलचे माजी प्रांतपाल व प्रसिद्ध वक्ते डॉ. रोटे. शैलेश पालेकर उपस्थित राहणार आहेत. तसेच असिस्टंट गव्हर्नर रोटे. राकेश शहा आणि रोटे. सुदर्शन कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी 2025-26 या वर्षातील विविध सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक व सेवा उपक्रमांचा आढावा घेण्यात येणार असून, आगामी वर्षातील लोकहिताचे प्रकल्पही जाहीर करण्यात येणार आहेत. गेली 62 वर्षे रोटरी क्लब जयसिंगपूरने समाजसेवेची अखंड परंपरा जपली असून, शहराच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या पदग्रहण सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0