देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्थांमध्ये शरद इंजिनिअरिंग ‘करिअर३६०’ कडून 'AAA' रेटिंग
आधुनिक सुविधा आणि शैक्षणिक उत्कृष्टतेची राष्ट्रीय पातळीवर दखल
यड्राव : प्रतिनिधी
अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील देशातील प्रतिष्ठित मूल्यांकन संस्था करिअर३६० यांनी जाहीर केलेल्या ‘भारतातील बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्युट २०२६’ या मानांकनामध्ये शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाला 'AAA' रेटिंग प्रदान करण्यात आले आहे. या मानांकनामुळे संस्थेने देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या यादीत मानाचे स्थान मिळविले असून, ‘शरद पॅटर्न’च्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता, अनुभवी प्राध्यापकवर्ग, अध्यापन पद्धती, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, संशोधन कार्य, प्लेसमेंट, शैक्षणिक गुणवत्ता, विविधता तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा सखोल अभ्यास करून देशभरातील इन्स्टिट्युटना करिअर३६० कडून हे मानांकन दिले जाते. या सर्व निकषांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला हा बहुमान प्राप्त झाला आहे.
महाविद्यालयाने गेल्या काही वर्षांत गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, आधुनिक प्रयोगशाळा, संशोधनाला प्रोत्साहन, नाविन्यपूर्ण उपक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले आहेत. ‘शरद पॅटर्न’च्या माध्यमातून गुणवत्ता, कौशल्य, शिस्त, उद्योगाभिमुखता आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण यांचा प्रभावी समन्वय साधण्यात संस्थेला यश आले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या उत्कृष्ट नोकरीच्या संधी, विविध स्पर्धा परीक्षांमधील यश आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी यामुळे संस्थेची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
या यशामागे संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रेरणादायी विचार आणि संस्थेच्या गुणवत्तावृद्धीसाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय हे महत्त्वाचे कारण ठरले आहेत. त्यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे आणि भक्कम पाठबळामुळे महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्टतेचा नवा मापदंड निर्माण केला आहे. संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी प्राचार्य, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि पालक यांचे अभिनंदन केले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0