जनताराचा संदेश बाळू बुबणे राज्यात प्रथम

जनताराचा संदेश बाळू बुबणे राज्यात प्रथम

May 8, 2026 - 18:55
 0  55
जनताराचा संदेश बाळू बुबणे राज्यात प्रथम
जनताराचा संदेश बाळू बुबणे राज्यात प्रथम
जनताराचा संदेश बाळू बुबणे राज्यात प्रथम

जयसिंगपूर : प्रतिनिधी

येथील श्री बाहुबली विद्यापीठ संचालित जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर व आक्काताई नरसाप्पा नांद्रेकर ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता दहावीचा निकाल 100 % लागला. यंदा सर्व चे सर्व म्हणजे 176 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. असून 90% पेक्षा अधिक गुण मिळवणारे 42 विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी - 115 विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये 39 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीमध्ये 20 विद्यार्थी व पास श्रेणी मध्ये 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातील संदेश बाळू बुबणे याने 500/500 गुण संपादन करून 100% टक्क्यांसह राज्यात व शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तर रिया पंकज काडगे - 498/500 गुण व 99.60% गुणांसह द्वितीय क्रमांक व अन्विक्षा अनमोल पाटील - 489/500 गुण व 97.80% गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. 

    सर्व गुणवंतांना विद्यार्थ्यांना जनतारा शालेय समितीचे चेअरमन महावीर पाटील, नांद्रेकर ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन राजेंद्र नांद्रेकर, कमिटी सदस्य, मुख्याध्यापक दीपक वाडकर, पर्यवेक्षक विनोद मगदूम, अध्यापक-अध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांचे मार्गदर्शन लाभले. तसेच श्री बाहुबली विद्यापीठ विश्वस्त समितीचे अध्यक्ष अरविंद दोशी, विद्यापीठाचे अध्यक्ष प्रकाश आवाडे, महामंत्री डी.सी. पाटील, कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील, संचालक गोमटेश बेडगे व ट्रस्टींचे प्रोत्साहन लाभले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0