रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर ट्रेड सिटीचा सहावा पदग्रहण सोहळा संपन्न

नूतन पदाधिकाऱ्यांचा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विक्रांतसिंह कदम यांच्या हस्ते सत्कार

Jul 28, 2026 - 17:07
 0  3
रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर ट्रेड सिटीचा सहावा पदग्रहण सोहळा संपन्न
रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर ट्रेड सिटीचा सहावा पदग्रहण सोहळा संपन्न
रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर ट्रेड सिटीचा सहावा पदग्रहण सोहळा संपन्न

जयसिंगपूर : प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर ट्रेड सिटीचा 6 वा पदग्रहण येथील सहकारमहर्षि स्व.शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात सोमवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी स्वागत रोटरीचे मावळते अध्यक्ष डॉ.अतिक पटेल यांनी तर प्रास्ताविक अॅडवोकेट उदय कुलकर्णी यांनी करत वर्षभरात झालेल्या कार्यक्रमाचा आढावा जाहीर केला.त्यानंतर मा.असिस्टंट गव्हर्नर गिरीश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर असिस्टंट गव्हर्नर रोहित शहा यांनी देखील मनोगत व्यक्त करीत रोटरीचा आढावा घेतला

त्यानंतर रोटरी ट्रेड सिटीचे नूतन अध्यक्ष रोटे.संतोष खामकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले 2026- 27 सालच्या कार्यकालमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवणार असून यासाठी नवीन निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन मिळालेल्या या पदाचा योग्य वापर करून समाज हिताची उपक्रम पार पडणार आहोत.तसेच वर्षाची सुरुवात डॉक्टर.डे ,सीए व किसान डे ,तसेच रक्तदान शिबिराने केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वर्षभरामध्ये शालेय शिक्षणासाठी आवश्यक सर्व बाबी आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रासाठी भरीव असे कार्य क्लबच्या माध्यमातून करणार असल्याचे अभिवाचन यावेळी दिले. तसेच रोटरी ट्रेड सिटीच्या अध्यक्षपदी मला विराजमान होण्यासाठी रोटरीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे त्यांनी आपल्या मनोगत म्हटले.

प्रारंभी राष्ट्रगीत झाले. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यासह येथील विविध शाळेच्या विद्यार्थिनींना शालेय गणवेश व सायकलींचे वाटप करण्यात आले.

दरम्यान या पदग्रहण सोहळ्यास प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले गणेश शिंदे यांनी आपल्या मनोगतिय भाषणात आजची युवा पिढी, हरवलेली माणुसकी, मोबाईलचा व सोशल मीडियाचा वापर तसेच भरकटलेली तरुणाई, कुटुंबातील तुटत चाललेला सुसंवाद व नाती यावर प्रबोधन केले. गणेश शिंदे यांनी केलेल्या भाषणामुळे उपस्थित सर्वजण भावनिक झाले तर काहींना अश्रू अनावर झाले.जवळपास दीड ते दोन तास झालेल्या गणेश शिंदे यांच्या भाषणावेळी नाट्यगृहात एकाही व्यक्तीचा फोन वाजला नाही इतक्या प्रभावी भाषणाने त्यांनी सर्वांची मने जिंकली.

रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर ट्रेड सिटीच्या पदग्रहण सोहळ्यास जयसिंगपूर शहरासह पंचक्रोशीतून तसेच सांगली ,कोल्हापूर भागातून विविध मान्यवरानी उपस्थित राहून सर्व पदाधीकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी या पदग्रहण सोहळ्यास खा.धनंजय महाडिक यांच्या स्नुषा सौ.वैष्णवी महाडिक यांच्यासह शरद साखरचे संचालक आदित्य पाटील यड्रावकर, सांगली महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पै. मंगेश चव्हाण, जयसिंगपूर स्वामी समर्थ दरबारचे गोवर्धन दबडे, मा. नगराध्यक्ष प्रकाश झेले आणि सामाजिक राजकीय व विविध संस्थेचे पदाधिकारी तसेच जयसिंगपूर, शिरोळ, इचलकरंजी या भागातील नगरसेवक ,मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रोटे.शिवराज पाटील, प्रशांत पाटील, विनेश खाडे ,बी टी नाईक, राकेश पारीख, अभय बनजवाडे,मनोहर माळी, सुनील पाटील, एडवोकेट प्रसाद काळे, कुलदीप विभुते, योगेश बलदवा ,डॉ. असिफ देसाई, इंजि. मुआज बोरकर, इंतेखाब मारूफ, भीमगोंडा बोरगावे, पंचायत समितीचे मा. सदस्य राजगोंडा पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे शेवटी आभार सेक्रेटरी महेश पाटील यांनी तर सूत्रसंचालन रोटे.मिलिंद भिडे, सदानंद गाडगीळ यांनी केले.तसेच सन 2026-27 सालच्या रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर ट्रेड सिटीचे नूतन अध्यक्ष संतोष खामकर,सेक्रेटरी महेश पाटील व खजिनदार राजकुमार बलदवा यांना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विक्रांतसिंह कदम यांनी कॉलर प्रधान करून शुभेच्छा दिल्या. तसेच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे, सामाजिक कार्यकर्ते विनायक गायकवाड, युगंधर चंदनशिवे, सचिन वरेकर ,अमित वाडेकर, निखिल खामकर ,डॉ. प्रसाद माने, दीपक कामत, रशीद डांगे यांच्यासह अकरा जणांना रोटरीचे नवीन सदस्य म्हणून रोटरी पिन देऊन स्वागत करण्यात आले. तर डॉ.अतिक पटेल, शिवराज पाटील,भाऊसो नाईक यांची डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0