चिपरी येथे आयुर्वेदिक चिकित्सालयाचे रविवारी उदघाटन

Aug 7, 2026 - 16:47
 0  3
चिपरी येथे आयुर्वेदिक चिकित्सालयाचे रविवारी उदघाटन

जयसिंगपूर : प्रतिनिधी

विद्यास्मृतीदिवस सेवा संस्था, कोल्हापूर संचलित ‘आचार्यश्री चिकित्सालय’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक आयुर्वेदिक चिकित्सालयाचे उद्घाटन रविवार (ता. ९) रोजी दुपारी १ वाजता होत आहे. चिपरी (ता. शिरोळ) येथील माय स्कूल शेजारी येथे मान्यवरांच्या उपस्थीत होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष चेतनजी देहिया आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक (वन) कृष्णप्रकाश यांच्या हस्ते उद्धघाटन होणार आहे. यावेळी महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड (IAS) प्रमुख उपस्थीत राहणार आहेत. ध्वजारोहण डॉ. सत्येंद्रकुमार जैन हे करतील. 

सोहळ्यास आचार्यश्री चंद्रप्रभसागरजी महाराज, सारस्वतसागरजी महाराज, जयंतसागरजी महाराज, सिद्धसागरजी महाराज तसेच शासन प्रभावक राजरत्नसूरिश्वरजी महाराज यांचे मंगल सान्निध्य लाभणार आहे. अध्यक्षस्थानी स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी आहेत.

यावेळी विविध विभागांना मान्यवरांच्या हस्ते नामकरण करण्यात येणार आहे. तसेच पंचकर्म कक्ष, महिला चिकित्सा कक्ष, विश्राम कक्ष आणि औषधालयाचे लोकार्पण होणार आहे.

दिवसभराच्या कार्यक्रमात सकाळी ५.४५ वाजता मंगल निनाद, ६.१५ वाजता अभिषेक पूजा, ७.१५ वाजता ध्वजारोहण, ८ वाजता चिकित्सालय शुद्धी व दर्शन विधी, ९ वाजता आहारचर्या, दुपारी १ वाजता उद्घाटन समारंभ, तर दुपारी ४ वाजता आचार्यश्रींचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.

या सोहळ्यास खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0