शरद कृषीच्या विद्यार्थीनींना बास्केटबॉल कास्यपदक

Oct 1, 2026 - 16:39
Oct 1, 2026 - 17:47
 0  2
शरद कृषीच्या विद्यार्थीनींना बास्केटबॉल कास्यपदक
नाशिक येथे शरद कृषिचा बास्केटबॉल संघ मान्यवरांच्या हस्ते बक्षिस स्विकारताना.

जयसिंगपूर : प्रतिनिधी 

जैनापूर येथील शरद कृषी मुलीच्या बास्केटबॉल संघाने तृतीय क्रमांक पटकावले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा संदीप फाऊंडेशन कृषी महाविद्यालय नाशिक येथे झाल्या. 

स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून दहा जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी माजी अधिष्ठाता डॉ.जे बी भाकरे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.विलास आवारी उपस्थीत होते.

 संघामध्ये श्रृती शिंदे (कर्णधार), प्रगती कर्नाळे, अक्षता सावंत, श्रेया पाटील, सृष्टी जक्कनवार, जान्हवी बंडगर, साक्षी आबाळे, आफ्रिन पेंढारी होते. त्यांना शरद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशांत पाटील, उपप्राचार्य प्रा. संजय फलके, क्रीडा शिक्षक प्रा. दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0