डॉ.जे.जे.मगदूम अभियांत्रिकीचा ब्रेनो व्हिजन सोल्युशन्स कंपनीशी सहकार्य करार
जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील डॉ.जे.जे.मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालय व 'ब्रेनोव्हिजन सोल्युशन्स' प्रा.लि.हैदराबाद यांच्यामध्ये सहकार्य करार ( एम.ओ.यु.) करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे.
या करारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ए.आय.आणि डी.एस. क्लाऊड कॉम्प्युटिंग अशा नवीन तंत्रज्ञानाचे व डिजिटल कौशल्येचे आधुनिक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण व प्रत्यक्ष अनुभव संधी उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे असे मत ट्रस्टी राजश्री मगदूम यांनी मांडले.
कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम,कार्यशाळा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम व इंटर्नशिप, प्रकल्पाधारित शिक्षण आणि उद्योगाभिमुख कौशल्यविकास उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जावा असे चेअरमन डॉ. विजय मगदूम म्हणाले. प्राध्यापकांसाठीही आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित प्रशिक्षण, क्षमता-विकास कार्यक्रम आयोजित करण्यास महाविद्यालयास सहकार्य मिळेल अशी आशा कार्यकारी संचालक डॉ.सुनील आडमुठे यांनी व्यक्त केली.
आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधारित युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता त्यांना उद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार सक्षम करणे आवश्यक आहे. ब्रेनो व्हिजन सोबतचा हा करार रोजगाराभिमुख संधी उपलब्ध करून देण्यावर भर देईल असा विश्वास प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला.
करार यशस्वीसाठी इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन सेलचे प्रमुख डॉ.फिरोज अमिन यांनी विशेष योगदान दिले.विभाग प्रमुख डॉ.शैलेंद्र धनाल,प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0