काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय ठरणार नागरिकांचे हक्काचे व्यासपीठ : गणपतराव पाटील
जयसिंगपूर येथे काँग्रेस पक्षाच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन
जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील शाहूनगर परिसरातील सुदर्शन चौक येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन समारंभ बुधवारी ( दि. १४ ) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दत्त उद्योग समूहाचे प्रमुख व उद्यान पंडित गणपतराव (दादा) पाटील यांच्या शुभहस्ते फित कापून कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक जयसिंगपूर शहराध्यक्ष सुदर्शन कदम यांनी केले.
दादा पूढे म्हणाले की जयसिंगपूर आणि शाहूनगर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे संपर्क कार्यालय हक्काचे केंद्र बनेल. राजकारणापलीकडे जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेणे आणि ते मार्गी लावणे हेच खऱ्या कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. या नूतन कार्यालयाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी सदैव तत्पर राहील,असा विश्वास उद्यानपंडित दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील म्हणाले, पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी या कार्यालयाची मोठी मदत होईल. सर्वसामान्यांचे काम या कार्यालयात आल्यानंतर पूर्ण केले जाईल. शाहूनगर परिसरासह जयसिंगपूरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी या संपर्क कार्यालयाचा उपयोग होणार आहे.
माजी नगरसेवक व उद्योगपती अशोकराव कोळेकर म्हणाले, संपर्क कार्यालय हे कार्यालय केवळ पक्षाचे नसून सर्वसामान्य जनतेचे सुख-दुःख मांडण्याचे हक्काचे ठिकाण असेल. शाहूनगर परिसरात रस्ते, पाणी, दिवाबत्तीची सोय तसेच नागरिकांची वैयक्तिक शासकीय व सामाजिक कामे पूर्ण करण्यासाठी हक्काचे ठिकाण बनणार आहे. यासाठी आपल्याकडून लागेल ती मदत केली जाईल असे सांगत लोकसंवादाचे महत्त्व अधोरेखित केले.
माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव - घुणकीकर म्हणाले, देशात सध्या काँग्रेसचे महत्व अधोरेखित होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष बळकट होणार आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी दूर करण्यास मदत होणार आहे.
जयसिंगपूरचे नगरसेवक रंगराव पवार म्हणाले, शाहूनगर आणि परिसरातील नागरिकांशी थेट संपर्क साधणे यामुळे अधिक सुलभ होईल आणि स्थानिक विकासाच्या प्रश्नांना गती मिळेल असे त्यांनी सांगितले.
यावेळी या उद्घाटन सोहळ्याला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दरगू गावडे, माजी नगरसेवक सर्जेराव पवार, युवा नेते वरुण पाटील, नगरसेवक पंकज गुरव, काँग्रेस महिला शहराध्यक्ष आम्रपाली कारंडे, प्रियंका जाधव, उद्योगपती दिलीप पाटील - कोथळीकर, विनायक कांबळे, सागर माने, लखन नलवडे, पवन सुतार, राज पवार, स्वप्नील कांबळे, अक्षय बाबर, ओंकार मुडशिं, शारुख झाजे, इम्तियाज खान, सचिन चकोते, राहुल घाटगे, नितीन जाधव, संतोष नलवडे, धरणगुती उपसरपंच विलास जाधव, अंकुश पवार, अरबाज मुजावर, शब्बीर शेख, शमशुद्दीन सय्यद, इम्तियाज खान, स्वाभिमानीचे शहराध्यक्ष शंकर नाळे यांच्यासह सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सहकारी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच शाहूनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक गुंडाप्पा पवार यांनी आभार मानले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0