ज्ञान, कौशल्ये आणि सर्जनशीलतेतून यशाचा मार्ग : विवेक कुलकर्णी
शरद इंजिनिअरिंगमध्ये इम्पेटस 2के26 स्पर्धा,3200 विद्यार्थी सहभागी
यड्राव : प्रतिनिधी
बदलत्या काळानुसार थेअरीवर आधारित शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष समस्यांचे निराकरण करण्यावर भर देणारी शिक्षणपद्धती विकसित झाली पाहिजे. उद्योगविश्वातील वास्तविक समस्या सोडविण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. आजच्या बदलत्या जगात केवळ इंजिनिअरिंगची पदवीसोबत अद्ययावत ज्ञान, तांत्रिक कौशल्ये आणि सर्जनशील विचारशक्तीही आवश्यक आहे. आणि हे आयुष्यभर शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. असे प्रतिपादन झेन्सारचे उपाध्यक्ष विवेक कुलकर्णी यांनी केले. ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आयोजित इम्पेटस 2के26 या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेच्या उदघाटन समारंभात बोलत होते.अध्यक्षस्थीनी संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे होते.
डॉ.ए.व्ही.व्ही.सुधाकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी उद्योगविश्वात उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यावर भर दिला पाहिजे. प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता विकसित करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, यासाठी एस.आर.युनिव्हर्सिटीमध्ये पूर्णवेळ इंटर्नशिपची सुविधाही उपलब्ध करून देता येईल.
डॉ.श्रीनिवास अलुवाला म्हणाले,यश मिळविण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसून मेहनत,चिकाटी आणि प्रयत्नांतील सातत्यही तितकेच आवश्यक आहे.विद्यार्थ्यांनी आव्हानांना सामोरे जात स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा.
अनिल बागणे म्हणाले, इम्पेटससारख्या तांत्रिक स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कौशल्यांना वाव मिळतो. यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि सातत्य या गुणांची आवश्यकता असते. अशा स्पर्धांमधील सहभागातून विद्यार्थ्यांचे केवळ तांत्रिक ज्ञान वाढत नाही, तर त्यांचे व्यक्तिमत्त्वही विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धांकडे केवळ बक्षीस मिळविण्याची संधी म्हणून न पाहता स्वतःला सिद्ध करण्याचे आणि भविष्यातील आव्हानांसाठी तयार होण्याचे व्यासपीठ म्हणून पाहावे.
यावेळी झेन्सारचे डायरेक्टर ऋतुराज पाटील उपस्थीत होते. प्र.प्राचार्य डॉ.बी.बी. संगमे यांनी मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धा समन्वयत प्रा. वर्षा जुजारे यांनी स्पर्धेविषयी माहीती दिली.स्पर्धेत महाराष्ट्रसह इतर राज्यातून असे एकूण 3200 विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी समन्वयक प्रा.वर्षा जुजारे यांच्यासह विभाग समन्वयक, डिन, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते. सूत्रसंचालन श्रध्दा लठ्ठे, तेजस्वीनी माने यांनी केले. आभार प्रा.प्रतिभा स्वामी यांनी मानले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0