डॉ.जे.जे.मगदूममध्ये नशामुक्त युवा विकसित भारत अभियानांतर्गत समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम संपन्न

Aug 11, 2026 - 17:45
 0  2
डॉ.जे.जे.मगदूममध्ये नशामुक्त युवा विकसित भारत अभियानांतर्गत समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम संपन्न
डॉ.जे.जे.मगदूममध्ये नशामुक्त युवा विकसित भारत अभियानांतर्गत समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम संपन्न

जयसिंगपूर : प्रतिनिधी

धरणगुत्ती येथील डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्ट संचलित अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज येथे "नशामुक्त युवा विकसित भारत अभियान" अंतर्गत समुपदेशन व जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले

कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगणे तसेच व्यसनमुक्त,निरोगी आणि सुदृढ जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी त्यांना प्रेरित करणे मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमात मुसा सुतार पोलीस उपनिरीक्षक,विलास निकम पो.ना.शिरोळ पोलीस ठाणे यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक,मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी निरोगी जीवनशैली अंगीकारावी,तणावाचे सकारात्मक व्यवस्थापन करावे आणि आवश्यकतेनुसार समुपदेशनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. संवादात्मक चर्चासत्र, प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणे आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सक्रिय सहभागाची प्रेरणा निर्माण झाली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी "नशामुक्तीची शपथ" घेऊन स्वतः व्यसनमुक्त राहण्याचा तसेच समाजामध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याचा संकल्प केला.

सदर कार्यक्रम ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम व ट्रस्टच्या व्हाईस चेअरपर्सन तथा सेक्रेटरी डॉ.अँड.सोनाली मगदूम यांच्या सामाजिक जाणिवेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सचिन निटवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS)विभागामार्फत कु.मनाली भिडे व कु.मानसी झाडे (व्याख्याता) यांनी यशस्वीरीत्या आयोजन केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0