संजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या कु.साईशा गावंडे विद्यार्थिनीला ७० लाखांचे स्टार्टअप फंडिंग मंजूर

May 26, 2026 - 20:04
 0  78
संजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या कु.साईशा गावंडे विद्यार्थिनीला ७० लाखांचे स्टार्टअप फंडिंग मंजूर

कोल्हापूर : प्रतिनिधी 

अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट आणि वायफाय फाउंडेशन पुणे यांच्यात विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम व उद्योजकता वाढवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत संजय घोडावत इन्स्टिट्यूट कॅम्पसमध्ये अत्याधुनिक वायफाय फाउंडेशन इन्क्युबॅशन सेंटर सुरू होणार आहे.  

या उपक्रमांतर्गत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थिनी कु. साईशा गावंडे आणि त्यांच्या टीमला स्केलेबल स्टार्टअप्ससाठी परिसंस्था निर्मिती या प्रकल्पास इक्विटी शेअरिंग आधारित तब्बल ‘७०’ लाखांचे स्टार्टअप फंडिंग मंजूर झाले आहे. या प्रकल्पास मार्गदर्शक इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी, मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. स्वप्नील थिकने, प्रा मुजामिल बेपारी यांचे लाभले आहे. 

विद्यार्थ्यांना व्यवसाय नियोजन, मेंटरशिप, उद्योग संपर्क, गुंतवणूकदार नेटवर्क आणि स्टार्टअप विकासासाठी आवश्यक सर्व प्रकारचे सहाय्य वायफाय फाउंडेशन पुणे अंतर्गत दिले जाणार आहे.

संजय घोडावत विद्यापीठाची चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी यांनी प्रकल्पातील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0