जयसिंगपूरात साकारणारी भीमसृष्टी प्रेरणादायी ठरेल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व भीमसृष्टी पायाभरणी शुभारंभ प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली माहिती

Jun 1, 2026 - 13:17
Jun 1, 2026 - 16:57
 0  242
जयसिंगपूरात साकारणारी भीमसृष्टी प्रेरणादायी ठरेल
जयसिंगपूरात साकारणारी भीमसृष्टी प्रेरणादायी ठरेल
जयसिंगपूरात साकारणारी भीमसृष्टी प्रेरणादायी ठरेल

जयसिंगपूर : प्रतिनिधी 

     भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जयसिंगपूर शहरात उभारण्याचा अनेक वर्षाचा प्रश्न मार्गी लागला असून शासनाकडील सर्व विभागाच्या रीतसर मान्यता घेऊन शहरातील सांगली कोल्हापूर रोडवरील एसटी स्टँड समोरील जागेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि त्यांचे दैदिप्यमान कर्तृत्व दर्शविणारी भीमसृष्टी उभी राहत आहे, हा परिसर अतिशय प्रेरणादायी आणि जयसिंगपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ठरेल असे उदगार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा व भिमसृस्टीचा पायाभरणी शुभारंभ जयसिंगपूर विहारातील आदरणीय भंते यश्य काश्यपायन यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. 

यावेळी जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती श्रद्धाताई गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या उत्तरा शिंदे, जिल्हा परिषद सदस्या प्रचिता कोळी, जि. प. सदस्य अमोल चव्हाण, पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे उपसभापती मनीषा कदम,

अमरसिंह माने पाटील, रामचंद्र डांगे, कुरुंदवाडचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, अक्षय आलासे, रणजीत कदम, सुभाषसिंग रजपूत, प्रताप उर्फ बाबा पाटील, विजयसिंह माने देशमुख, जयसिंगपूरच्या उपनगराध्यक्षा अनुराधा आडके, मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी, सर्व आजी माजी नगरसेवक, नगरसेविका

पंचायत समिती सदस्य प्रवीण देसाई, फैजल पटेल,अविनाश पाटील,बाबासो वनकोरे, सीमा म्हैशाळे, रमेशबापू शिंदे, समन्वयक सुरेश कांबळे, मिलिंद शिंदे,आनंदा शिंगे, बाळासाहेब कांबळे, सुनिल कांबळे अनुप मधाळे, सुरज शिंगे विकास कांबळे, बी.आर. कांबळे, जय कडाळे, सुनिल कुरुंदवाडे, धम्मपाल ढाले, सेनापती भोसले, विश्वास कांबळे, शिवाजी कांबळे, सुनील कांबळे, सागर बिरणगे, उमेश आवळे, विजितसिंह शिंदे, मिलिंद भिडे, विकास कांबळे, अमरदीप कांबळे, अमरसिंह निकम, गौतम वाघवेकर, एडवोकेट शितल कांबळे, नगरसेवक सुरज कांबळे यांच्यासह आंबेडकर चळवळीतील तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी भीमसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दलित चळवळीमधील पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचे अभिनंदन करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0