कामगारांसाठी रुग्ण सेवा व सुश्रुषा केंद्र सुरु करणार : माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची घोषणा

Jun 2, 2026 - 09:34
 0  9
कामगारांसाठी रुग्ण सेवा व सुश्रुषा केंद्र सुरु करणार : माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची घोषणा

इचलकरंजी - प्रतिनिधी

इचलकरंजी शहर वस्त्राेद्याेगाचे प्रमुख केंद्र असून कामगारांचे शहर आहे. याठिकाणी कार्यरत गाेरगरीब सर्वसामान्य कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या आराेग्य सुविधांसाठी शहरात एमएसएमई अंतर्गत काॅमन फॅसिलिटी सेंटर म्हणून रुग्ण सेवा आणि सुश्रुषा केंद्र सुरु करण्यात येणार अशी घोषणा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली. डाॅ. सुषमा पुजारी यांच्या सहकार्याने हे केंद्र नजीकच्या काळात सुरु हाेणार असल्याची माहिती माजी वस्त्राेद्याेग मंत्री यांनी दिली. येथील श्री शंभुतीर्थ परिसरात समस्त धनगर समाजाच्या वतीने माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर यांच्या 301 व्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बाेलत हाेते.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून उदरनिर्वाहाच्या निमित्ताने अनेक कामगार कुटुंबे याठिकाणी वास्तव्यात आहेत. शहराचे औद्याेगिकरण वेगाने वाढत असून कामगारांची माेठ्या प्रमाणात गरज भासणार असल्याचे बोलून त्यामुळे आता कार्यरत गाेरगरीब सर्वसामान्य कामगारांच्या आराेग्याची काळजी घेणे तसेच वेगवेगळ्या सुविधा देणेची गरज असल्याचे माजी मंत्री आवाडे यांनी स्पष्ट केले. तर या पार्श्वभूमीवर डाॅ.साै.सुषमा पुजारी यांच्या सहकार्याने कामगारांच्या आजारीपणात सेवा सुश्रुषा करणेसाठी रुग्ण सेवा आणि सुश्रुषा केंद्र सुरु करणार असल्याचे ते म्हणाले. त्या अंतर्गत हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तसेच ज्यांच्या घरी सेवा सुश्रुषेची साेय नाही अशा रुग्णांच्या आराेग्याची काळजी घेणे, औषधाेपचार करणे साेयीचे हाेणार असल्याचे ते म्हणाले.

भावी पिढीला अहिल्यादेवी हाेळकर यांच्या कार्याची व इतिहासाची माहिती व्हावी यासाठी शहापूर येथील चाैकात पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर यांचा पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी पांडुरंग साेलगे आणि अशाेक पुजारी यांनी यावेळी केली.

याप्रसंगी विठ्ठल चाेपडे, रवी रजपुते, राजू पुजारी, डाॅ. सुषमा पुजारी, साै. ध्रुवती दळवाई, विद्या लवटे, पै. अमृत भाेसले, ओंकार सुर्वे, अभिषेक वाळवेकर, सुशांत कलागते, नागेश पाटील आदींसह मान्यवर उपस्थित हाेते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0