माधुरीसाठी आंदोलन केलेल्या नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार – आमदार यड्रावकर

नांदणीतील माधुरीच्या निवारा केंद्राची केली पाहणी

Jun 18, 2026 - 18:22
 0  5
माधुरीसाठी आंदोलन केलेल्या नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार – आमदार यड्रावकर
माधुरीसाठी आंदोलन केलेल्या नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार – आमदार यड्रावकर

नांदणी : 

नांदणी मठात लवकरच माधुरी हत्तीणीचे पुनरागमन होणार असून इतर हत्तींसाठी देखील या निवारा केंद्रात सोय करण्यात येईल, तसेच माधुरी हत्तीसाठी आंदोलन केल्याप्रकरणी ४० हून अधिक नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

नांदणी मठात माधुरीच्या निवारा केंद्राची पाहणी करण्यासाठी आमदार यड्रावकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माधुरीच्या निवासासाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि अन्य कामांचा आढावा घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. माधुरीच्या पुनरागमनामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून तिच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

माधुरी हत्तीणीच्या निवासासाठी उत्तम दर्जाच्या सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. शेडची रंगरंगोटी, सुरक्षिततेसाठी संरक्षक जाळ्या, स्वच्छ पाणी, आरोग्यविषयक सुविधा तसेच आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधांची उभारणी केली जात आहे. हत्तींसाठी अनुकूल आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर दिला जात आहे.

यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, माधुरीच्या आगमनामुळे मठ परिसरातील प्राणिसंवर्धन उपक्रमाला अधिक बळ मिळणार असून पर्यटक आणि प्राणिप्रेमींसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

माधुरीला वनताराला नेत असताना तिच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर ४० हून अधिक नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, वनताराचे धर्मेश सयानी , धनशाम पडरिया, जिल्हा परिषद सदस्या प्रचिता कोळी, सरपंच संगीता तगारे, माजी सभापती मिनाक्षी कुरडे, मायगोंड पाटील, सागर शंभुशेटे, संजय बोरगांवे, बाहुबली चौगुले, पी. एल. आंबी, बाबासो बागडी, प्रशांत लड्डे, राकेश पाटील-सावंत्रे, बबन टारे, सुजय पाटील, संजय कुरडे, रोहन पाटील, निखिल टारे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0