डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांची अभिनंदनिय निवड
39 विद्यार्थी यझाकी कंपनीत
जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या ३९ विद्यार्थ्यांची 'यझाकी इंडिया' प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये निवड झाली अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सौरभ खानावळे यांनी दिली. यझाकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जपानमधील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपोनंट कंपनी आहे.
कंपनीची मुख्य शाखा पुणे येथे असून ती वाहनासाठी वायरिंग हार्नेस, इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आणि ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल सिस्टम तयार करते. महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशन विभागाच्या आदेश गवळी, आदित्य कचरे, आदित्य पोटे, अंजुम जमादार, गायत्री पाटील, जय भावसार, सोनाली जानकर, विवेक पाटील, कुमार पाटील, कुणाल गौराज, मिजान शेख, नेहा पतंगे, नित्या उपाध्ये, ओम पोतदार, स्वाती शिंदे, यश जाधव, ओमकार पाटील, ओंकार शिंगाटे, प्रणव जवळकर, प्रतीक्षा मोहिते, प्रियंका म्हेत्रे, प्रतीक्षा रामतीर्थकर, तनया पवार, जोया पठाण, रवीना पवार, रेवणसिद्ध जिरोले, रोहन माने, रुद्र गुलमिरे, ऋषिकेश कुंभार, वैभव चव्हाण, विकास कुंभार, सानिया खोत, श्रद्धा जगताप, श्रावणी सूर्यवंशी, श्रीकांत जोशी, सोफिया नदाफ, सोनल दुर्गुळे, वैष्णवी जाधव या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअर पर्सन डॉ. सोनाली मगदूम, कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख, प्राध्यापक व प्रत्येक विभागाचे ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0