डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्टच्या अनिल उर्फ पिंटू मगदूम फार्मसी महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के

जिल्ह्यातील पहिले एन बी ए आणि आयएसओ मानांकन प्राप्त महाविद्यालय

Jun 28, 2026 - 12:11
 0  14
डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्टच्या अनिल उर्फ पिंटू मगदूम फार्मसी महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के
डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्टच्या अनिल उर्फ पिंटू मगदूम फार्मसी महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के

जयसिंगपूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टच्या, अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज, धरणगुत्ती ता शिरोळ या महाविद्यालयाचा प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल १०० टक्के लागला असून

महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले व एकमेव नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडिटेशन (NBA) मान्यता प्राप्त व आय.एस.ओ. (ISO) मानांकन प्राप्त केले. द्वितीय वर्षामध्ये कु. शुभांगी सुनिल शिकलगार हिने ८१.३६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. तनिष्का परशराम कोळेकर हिने ८०.०९ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. नाज शमशुद्दीन मकानदार हिने ७९.७३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. तर

प्रथम वर्षामध्ये कु. मानसी अशोक पत्रे हिने ८०.०९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. मिस्वाह गुलाब बुरण हिने ७७.७० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. सायली सतीश आंबी हिने ७६.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

गुणवंतांना संस्थेचे प्राचार्य डॉ. सचिन आ. निटवे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय जे. मगदूम, उपाध्यक्षा तथा सेक्रेटरी ॲड. डॉ. सौ. सोनाली वि. मगदूम आणि संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. सुनिल आडमुठे यांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0