रिपाई आठवले गटाचा 14 ऑक्टोबर पासून समाज परिवर्तन मार्च
महात्मा फुले जयंती चे द्विशताब्दी आणि चवदार तळ्याचा सत्याग्रह शताब्दीचे औचित्य साधून आयोजन
कोल्हापुर : प्रतिनिधी
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महाड चवदारतळे सत्याग्रहाला महाड क्रांतीला यंदा 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाड चवदारतळे क्रांतीचे शताब्दी वर्ष आणि महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती चे द्विशताब्दी वर्ष याचे औचित्य साधुन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या 14 ऑक्टोंबर पासुन संपूर्ण महाराष्ट्र राज्यात समाज परिवर्तन मार्च चे आयोजन करीत असल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली. कोल्हापुरात आयोजित केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ना. रामदास आठवले बोलत होते..
येत्या दिनांक 14 ऑक्टेंबर 2026 रोजी सकाळी सातारा येथुन समाज परिवर्तन मार्चचा शुभारंभ होत असून त्यानंतर कोल्हापुर येथे 14 ऑक्टोंबर 2026 रोजी संध्याकाळी कोल्हापुर येथे भव्य बौध्द धम्म परिषदेचे आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर समाज परिवर्तन मार्च हा सातारा, कोल्हापुर, सांगली, सोलापुर मार्गे संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, करुन 18 नोव्हेंबर 2026 रोजी पुण्यामध्ये या समाज परिवर्तन मार्चचा समारोप होईल.
रिपब्लिकन पक्ष सत्तेत जरी असला तरी सामाजिक प्रश्नांवर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी संघर्ष, आंदोलन केले पाहिजे. समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. असा आदेश यावेळी ना आठवले यांनी दिला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0