शरद इन्स्टिट्युटच्या ८ विद्यार्थ्यांची कंपनीत निवड

Jul 7, 2026 - 16:31
 0  1
शरद इन्स्टिट्युटच्या ८ विद्यार्थ्यांची कंपनीत निवड

यड्राव : प्रतिनिधी

येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आठ विद्यार्थ्यांची फोर्स मोटर्स व कंट्रोलएस डेटा सेंटर्स लिमिटेड या नामांकित कंपनीत निवड झाली. महाविद्यालयातील मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल व सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली.

फोर्स मोटर्स कंपनीत विग्नेश कामत, अनिरुध्द परीट, केदार कुलकर्णी तर कंट्रोलएस डेटा सेंटर्स कंपनीत चेतना शिंदुरे, संध्या कोळी, निलेश कोरे, अनिरुध्द सचिन परीट, सुजय रुग्गे या विद्यार्थ्यांची निवड झाली.

फोर्स मोटर्स १९५८ मध्ये स्थापन झालेली पुणेस्थित ही भारतातील अग्रगण्य व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी असून, सुमारे ४६४० कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीची वार्षिक उलाढाल ९ हजार कोटींपेक्षा अधिक असून फोर्स ट्रॅव्हलर, गुरखा, रुग्णवाहिका तसेच मर्सिडीज-बेंझ आणि बीएमडब्ल्यु साठी इंजिन निर्मितीसाठी ती विशेष ओळखली जाते.

कंट्रोलएस डेटा सेंटर्स लिमिटेड हि २००७ मध्ये स्थापन झालेली हैदराबादस्थित भारतातील अग्रगण्य डेटा सेंटर आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी असून, देशभरातील १७ अत्याधुनिक डेटा सेंटर्समधून बँकिंग, आयटी, ई-कॉमर्स, सरकारी संस्था व बहुराष्ट्रीय कंपन्यांना सेवा पुरवते. कंपनीमध्ये सुमारे २५०० हून अधिक कर्मचारी कार्यरत असून वार्षिक उत्पन्न पंधराशे कोटींपेक्षा अधिक आहे.

महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट अंतर्गत ग्रुप डिसक्शन, इंटरव्ह्यु टेक्नीक्सचा सराव, पर्सनॅलिटी डेव्हलेपमेंट, इंटरपर्सनल स्किल्स, मॉक इंटरव्हयु यांची तयारी करुन घेतली जाते. तसेच कंपनीपूरक प्रशिक्षण दिले जाते त्याचा फायदा विद्यार्थ्यांना या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी झाला. 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0