सोंगट्याचा खेळ खेळणारे कारभारी तर बिनकामाच्या मुख्याधिकारी

शिवपुत्र जीवन पाटील आत्मदहानावर ठाम

Jul 10, 2026 - 10:31
 0  75
सोंगट्याचा खेळ खेळणारे कारभारी तर बिनकामाच्या मुख्याधिकारी

जयसिंगपूर: प्रतिनिधी 

गेली अनेक वर्षे या शहरातील प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधी कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करण्याचे सर्वसामान्य नागरिकांनी टाळले असले तरी या शहराचा कारभार म्हणजे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी पटसोंगटीचा खेळ चालवल्याचा खळबळजळक आरोप शहरातील खंदे खमके नागरिक शिवपुत्र जीवन पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना केला असून प्रशासनाने त्यांना आत्मदहनाच्या आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असला तरी शिवपुत्र जीवन पाटील हे त्यांच्या आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. 

जयसिंगपूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी आंदोलन स्थगित करणे बाबत शिवपुत्र जीवन पाटील यांना विनंती पत्र दिल्याचे सांगून दोन वर्षांपूर्वी देखील असेच पत्र दिले होते दोन वर्षात ज्या प्रशासनाला शिवाजी हाऊसिंग सोसायटीतील अतिक्रमण कारवाईत काडीचेही काम करता आले नाही ते आता तरी कसे करणार? असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.

गेल्या महिन्याभरात सतत तक्रार करून देखील शिवाजी हाउसिंग सोसायटी सध्या सुरू असणारे सिटी सर्वे 1732 /42 मधील नियमबाह्य बांधकाम नगरपालिकेला थांबवता आलेले नाही, या प्रकाराची नाराजी व्यक्त करीत सदरचे बांधकाम हे सुट्टीच्या दिवशी म्हणजे केवळ शनिवार रविवार चालते अशी माहितीही पाटील यांनी उजेडात आणली. नगरपालिकेच्या संबंधित नगर रचना अधिकाऱ्याला फोन केला तर तो कारभाऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत फोन उचलत नाही. मेसेज बघत नाही कारवाई तर दूरच, अशी खंत व्यक्त करीत अशा प्रशासनाच्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा असाच सवाल उपस्थित करून यथावकाश कारवाई करण्यात येईल हा अवकाश एका आयुष्याचा संपणार आहे का मग आयुष्य संपवलेले का वाईट? असाही प्रश्न शिवपुत्र जीवन पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

जन्मठेप 14 वर्षाची मात्र पाटील यांच्या तक्रारीला निरसन करण्यासाठी सोळा वर्षे उलटून गेली 

जन्मठेप सुद्धा 14 वर्षाची असते इथे तर तक्रार करून सोळा वर्षे उलटली त्यामुळे आत्मदहनाचा निर्णय कायम असल्याचे जीवन पाटील यांनी सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0