जयसिंगपूर पालिकेचा कारभार चक्क कृत्रिम बुद्धिमत्तेचा! प्रशासन सुस्त
जयसिंगपूर : प्रतिनिधी
यंदा झालेल्या या नगरपालिका निवडणुकीपूर्वी मला मते द्या म्हणून ज्या मोबाईलवरून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले तो मोबाईल नंबर आता नॉट रिचेबल असून विद्यमान नगराध्यक्ष यांचा 'चालू ' फोन सध्या चार रिंग झाल्यानंतर रेकॉर्डिंग मशीनला जोडला जातो. ज्याला कोणतेही प्रत्युत्तर दिले जात नाही.म्हणजेच सध्या जयसिंगपूर नगरपरिषद कौन्सिलचा कारभार हा एका एआय प्रणालीमार्फत राबवला जात आहे. या शहराचा कारभार सध्या कृत्रिम मेंदूवर चालू असल्याचा बोलबाला अखंड शहरात सुरू आहे.
दरम्यान जयसिंगपूर शिरोळ रोड लगतच्या शिवाजी हाउसिंग सोसायटी मधील रस्त्यावर केलेली अतिक्रमणे यापूर्वीच्या 3 मुख्याधिकाऱ्यांनी आपापल्या अधिकारात काढून टाकण्याची प्रक्रिया राबवल्याचे समाधान ही व्यक्त होत आहे. तत्कालीन करण्यात आलेल्या कारवाईमुळे कॉलेजकडे जाणारा रहदारीचा रस्ता सामान्य जनतेसाठी व विद्यार्थ्यांसाठी खुला करण्याचे पालक वर्ग बोलत आहे. त्यावेळी मालू हायस्कूल लगत असणारा रस्ता खुला करण्यात आला, मात्र एका आडमुठ्या सभासदाने रस्त्यात आडवी भिंत बांधली आणि विशेष म्हणजे माननीय कोर्टाने ती भिंत काढण्यास मनाई केली.असे उत्तर नगरपालिकेच्या कायदेशीर सल्लागार देतात.
भाजी मंडई व अग्निशामक दल यांच्याकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता सोसायटीने एका कारणाने कंपाउंड वॉल व पंडित निवास तसेच सभागृह बांधून अडवणूक केली आहे. यातील काही भाग नगरपालिकेच्या सक्षम अधिकाऱ्याने यापूर्वी निष्कासित केला त्यावेळी या जनहितार्थ कृत्याचा गावभर मोर्चा काढून निषेध केला होता. एका विशिष्ट धर्मप्रजातीला अति महत्त्व देऊन त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालण्याचे काम जयसिंगपूर व शिरोळ तालुका राजकीय सत्ता करत असल्याचा गंभीर आरोप शिवपुत्र जीवन पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
वर्तमान अतिक्रमण निर्मूलन कारवाईत प्रशासनाचा दुजाभाव
दुसऱ्या बाजूला कोल्हापूर सांगली महामार्ग वरील क्रांती चौक, शहा पेट्रोल पंप समोरच्या रस्त्यावर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करताना एक नियम तर शिवाजी हौसिंग सोसायटी अतिक्रमण साठी वेगळा नियम असा दुजाभाव उघड उघड दिसत आहे. तर धन दांडग्यांनी केलेली चोचले पुरवणारी सिमेंट काँक्रीटची अतिक्रमित बांधकामे आणि गोरगरिबांनी पोटापाण्यासाठी केलेली लाकडी टपरी त्यात भेदभाव का? असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे.
अतिक्रमणे निर्मूलन करण्यास प्रशासनाला भाग पाडणारा अवलिया शिवपुत्र जीवन पाटील
या शहरातील एकटाच खमका अवलिया नागरिक आणि कार्यकर्ता शिवपुत्र जीवन पाटील यांनी पुन्हा पुन्हा आंदोलन करून गेल्या सोळा वर्षांमध्ये नगरपालिका प्रशासनाला राजकीय सत्ते विरोधात जाऊन अतिक्रमण काढण्यास भाग पाडले आहे. पण सध्या दोन रस्त्यांवर असणारे अंशतः धार्मिक स्वरूपाचे अतिक्रमण काढणे बाबत सध्याचे विद्यमान नगराध्यक्ष यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये शिवपुत्र यांनी दिलेल्या आत्मदहनाच्या इशारा वेळी सामंजस्याने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. दोन महिन्यात जो विषय मार्गी लागणार होता त्याला तब्बल दोन वर्षे ओलांडली आहेत. दोन वर्षात दोन महिने मुदतवाढ मागणारा मोबाईल सध्या एआय झाल्यामुळे प्रत्यक्ष आंदोलनाशिवाय पर्याय नाही म्हणून शिवपुत्र जीवन पाटील यांनी नगराध्यक्ष यांच्या कार्यालयासमोर समोर 14 जुलै रोजी आत्मदहनाचा इशारा दिला असून या सर्व अतिक्रमणांची तक्रार सन 2010 मध्ये करण्यात आली होती. वेळोवेळी आलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी अल्पशा कारवाई देखील केली आहे .मात्र सध्या पदस्थ असणाऱ्या मुख्याधिकारी यांनी यापूर्वीच्या कारकीर्दीत ज्यावेळी कोर्टाचा कोणताही स्टे नव्हता त्यावेळी अतिक्रमण कारवाई करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन पथकास आदेशित केले असता सध्याच्या नगराध्यक्षांनी तसे करण्यास अटकाव केला होता. असे माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त माहितीनुसार दिसून येते. त्यामुळे व्यथित होऊन शिवपुत्र यांनी आत्मदहनाचा इशारा गेला असून आता कृत्रिम बुद्धिमत्तेचे या शहराचे प्रशासन काय दिवे लावणार याकडे समस्त नागरिकांचे लक्ष लागून आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0