साहित्य निर्मात्यांनी शेतकरी हा करमणुकीचा विषय बनवला : माजी खासदार राजू शेट्टी यांची खंत
जयसिंगपूर : प्रतिनिधी
मराठी साहित्याचे जतन जोपासना आणि संवर्धन करताना काही अपवाद वगळता शेतकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडण्याचे काम झालेले नाही होतच नाही. तर शेतकरी हा विषय म्हणजे करमणुकीचा विषय बनवल्याची खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वसर्वा तथा नांगरट साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. तर शेतकऱ्यांच्या वेदनेला वाचा फोडण्याचे काम साहित्य निर्मात्याने त्यांच्या लेखणीतून करावे लेखणीतून करावे असा संदेश साहित्य निर्मात्यांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने हे नांगरट साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले. तर साहित्यामध्ये सरकारला वळवण्याची आणि झुकवण्याची ताकद असते असा आत्मविश्वास व्यक्त करीत समाजाची मानसिकता शेतकऱ्याची मानसिकता सरकारी धोरण आणि निसर्गाचा लहरीपणा अशा दुष्ट चक्रात उसाचे गाळप करणाऱ्या चरकातील उसाप्रमाणे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे दुःखही शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0