शरद इन्स्टिट्युटच्या १४ विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीत निवड

Jul 16, 2026 - 12:45
 0  1
शरद इन्स्टिट्युटच्या १४ विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीत निवड

यड्राव : प्रतिनिधी

येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या १४ विद्यार्थ्यांची कल्पा पॉवर व जॉन्सन कंट्रोल्स या दोन नामांकित कंपनीत निवड झाली. महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग या विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली. 

कल्पा पॉवर कंपनीत अक्षय चौगुले, सौरभ लोखंडे, कुणाल कांबळे, सुजल जमदाडे, श्रेयश पाटील, इंद्रजीत सपकाळ, अरमान कुलकर्णी, आदर्श मगदूम, मंजूनाथ चौगुले, ऋषीकेश कोळी, सिध्दीकेश आबळे, अभिषेक जाधव, प्रतिक गडदे तर जॉन्सन कंट्रोल्स कंपनीत मंगेश मोर्वेकर या विद्यार्थ्यांची निवड झाली.  

कल्पा पॉवर प्रा. लि. ही पुणे येथील अग्रगण्य ऊर्जा व्यवस्थापन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील भारतीय कंपनी आहे. कंपनी औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांसाठी सौरऊर्जा प्रकल्प, बॅटरी ऊर्जा साठवण, ओपन अॅक्सेस वीजपुरवठा, ऊर्जा कार्यक्षमतेच्या सेवा आणि विद्युत पायाभूत सुविधा उभारणीची कामे करते. 

जॉन्सन कंट्रोल्स ही जगातील अग्रगण्य स्मार्ट बिल्डिंग, ऊर्जा कार्यक्षमता, एचव्हीएसी, अग्निसुरक्षा आणि बिल्डिंग ऑटोमेशन क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. कंपनी १५० हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. इमारती अधिक सुरक्षित, ऊर्जा-कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी ही कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल उपाय पुरवते.

 महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अॅप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्ऩिकल स्कीलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यु यासह टेक्निकल सेशन, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसीपीक ट्रेनिंग, अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तंज्ञामार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात. प्रोजेक्ट बेस लर्निंग अंतर्गत विद्यार्थ्यांना दुस-या वर्षापासूनच प्रोजेक्ट दिला जातो. तसेच तृतीय वर्षापासूनच अॅप्टीट्युड ट्रेनिंग, कोडींग लँग्वेज स्कील, माजी विद्यार्थांकडून मार्गदर्शन घेतले जाते. शेवटच्या वर्षी सहा महिने इंडस्ट्री इंटर्नशिप असते. या सर्वाचा उपयोग विद्यार्थ्यांना या कॅम्पससाठी झाला. 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0