शरद सहकारी साखर कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामाचा रोलर पूजन सोहळा उत्साहात

Jul 18, 2026 - 19:55
 0  87
शरद सहकारी साखर कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामाचा रोलर पूजन सोहळा उत्साहात
नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामानिमित्त मिल रोलरचे पूजन करून आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते रिमोटद्वारे रोलरचे सेटिंग करण्यात आले. यावेळी प्रकाश पाटील, सुभाषसिंग रजपूत, आदित्य पाटील यड्रावकर आणि डी.बी.पिष्टे उपस्थित होते.

पेठवडगांव : प्रतिनिधी

आगामी गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शरद सहकारी साखर कारखाना प्रशासनाकडून सूक्ष्म व कार्यक्षम नियोजन सुरू आहे. कारखान्यातील तांत्रिक कामे वेगाने पूर्णत्वाकडे जात असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रसामग्री सज्ज करण्याचे काम सुरू आहे. शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आतापर्यंतचे सर्व गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले असून, यंदाच्या हंगामातही जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.

नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामानिमित्त आयोजित मिल रोलर पूजन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. धार्मिक विधीनुसार पूजन संचालक पोपट भोकरे आणि कारखान्याचे फिटर हंबीरराव माळी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर, जिल्हा परिषद सदस्या प्राचिता कोळी, प्रवीण देसाई, प्रकाश पाटील टाकवडेकर, दशरथ पिष्टे, अभिजित भंडारी, आप्पासाहेब चौगुले, लक्ष्मण चौगुले, रावसाहेब कुंभोजे, रावसाहेब चौगुले, मुख्य कार्यकारी बी. ए.आवटी, नगरसेवक जवाहर पाटील, जय कडाळे, गीरमल कोळी, संतोष भोसले, शरद आलासे, रणजीत पाटील, विश्वास बालीघाटे, विद्याधर कुलकर्णी, अविराज पाटील, शकील शेख, विनोद कागले, सुरेंद्र जंगम, अनिल चौगुले, सतीश बरगाले, शैलेंद्र गुरव, बाबासाहेब नाईक आणि दीपक भोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सुभाषसिंग रजपूत यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर कार्यकारी संचालक एम. एम. पट्टणकुडे यांनी आभार मानले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 1
Sad Sad 0
Wow Wow 0