आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची खलिफा कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

जुन्या स्मृतींना उजाळा

Aug 7, 2026 - 09:56
 0  15
आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची खलिफा कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

यड्राव : प्रतिनिधी

ज्येष्ठ समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व आणि यड्रावकर गटाचे ज्येष्ठ सहकारी रमजानचाचा (रहेमानचाचा) खलिफा यांच्या पत्नी स्व. लालबी रमजानचाचा खलिफा यांच्या आकस्मिक निधनानंतर शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी हत्ती चौक येथील खलिफा कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

 स्व. शामराव (आण्णा) पाटील-यड्रावकर आणि रमजानचाचा खलिफा यांच्यातील जिव्हाळ्याच्या मैत्रीच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

रमजानचाचा खलिफा हे यड्राव सन १९५७ च्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळापासून स्व. शामराव अण्णा पाटील-यड्रावकर यांच्यापासून आजपर्यंत लवकर गटाशी ती एकनिष्ठ राहिले आहेत. तसेच प्रत्येक राजकीय आणि सामाजिक वाटचालीत त्यांनी यड्रावकर गटाला साथ दिली आहे. त्यामुळे यड्रावकर कुटुंब आणि खलिफा कुटुंब यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध आजही कायम असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

 इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन आणि इचलकरंजी अर्बन बँक या महत्त्वाच्या संस्थांमध्ये संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.स्व.शामरावअण्णा पाटील यड्रावकर त्यांच्याबरोबर काम केलेल्या कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचा संबंध ठेवण्याचे काम आजही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे.

या सांत्वन भेटीदरम्यान शौकत खलिफा, मुसा खलिफा, प्रकाश अकिवाटे, संकेत बरगाले, संजय नांदणे यांच्यासह खलिफा कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, आप्तस्वकीय आणि यड्रावकर गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0