डॉ.जे.जे.मगदूम आयुर्वेद कॉलेजमध्ये राष्ट्रीय आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा

Oct 22, 2026 - 11:54
 0  2
डॉ.जे.जे.मगदूम आयुर्वेद  कॉलेजमध्ये राष्ट्रीय आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा

जयसिंगपूर : प्रतिनिधी

 येथील डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्टच्या डॉ.जे.जे.मगदूम आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये ११ वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी निर्मल व्यसनमुक्ती केंद्र, मिरज येथील डॉ. कृष्णराजसिंग ठाकूर यांचे 'नशामुक्ती जागृती' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी नशामुक्त जीवनशैलीची गरज, मानसिक स्वास्थ्य आणि व्यसनमुक्तीनंतरचे पुनर्वसन यामध्ये आयुर्वेदाची भूमिका अत्यंत सविस्तरपणे विशद केली. 

    व्याख्यानानंतर कॉलेजमधील सर्व उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी 'नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत प्रतिज्ञा (शपथ) घेतली. राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाच्या अनुषंगाने महाविद्यालया मार्फत विविध लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने आयुर्वेद जनजागृतीसाठी वृक्षारोपण, मोफत आरोग्य तपासणी शिबिर,आरोग्यवर्धिनी प्रदर्शन, पथनाट्य सादरीकरण, प्रकृती परीक्षण आणि जीवनशैली समुपदेशन शिबिर, महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर तसेच आयुर्वेदिक पाककृती स्पर्धा अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांचा समावेश होता.

        सदर कार्यक्रमाचे नियोजन डॉ वर्षा समराई,डॉ. मंजुषा देसाई ,डॉ.प्रिती मगदूम आणि प्रा.सिद्धार्थ साठे यांनी केले होते. या उपक्रमाला विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय मगदूम आणि उपाध्यक्षा अ‍ॅड.डॉ.सौ. सोनाली मगदूम तसेच प्राचार्य डॉ.प्रमोद बुद्रुक यांचे मार्गदर्शन लाभले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0