शरद कृषि हळद पिक तंत्रज्ञान परिसंवाद संपन्न
जयसिंगपूर : प्रतिनिधी
जैनापूर येथील शरद कृषी महाविद्याल, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय भारत सरकार अंतर्गत मसाले बोर्ड, मुंबई व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी हळद पिक तंत्रज्ञान संपन्न झाले. उदघाटन शासकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.विश्वनाथ शिंदे व संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले.
यावेळी डॉ.शिंदे यांनी शेती तंत्रज्ञान व दुष्काळ परिस्थित शेतीची घ्यावयाची काळजी आणि शेती उत्पादनासाठी उपलब्ध असलेल्या एक्सपोर्ट बाजारपेठ याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
मार्गदर्शक डॉ.मनोज माळी यांनी शेतकऱ्यांना हळद लागवड करणे पासून हळद उत्पादन घेत असताना हळदीमध्ये आंतरपिके कोणती घ्यावीत.खत मात्रा,त्याचे प्रमाण व पद्धती याची सविस्तर माहिती दिली. पाण्याचे नियोजन कसे असावे, रोगापासून पिकांची मुक्तता, हळद उद्योग, व बाजारपेठेतील हळदीचे महत्व याबद्दल मार्गदर्शन केले आहे.
डॉ.ममता धनकुटे यांनी हळदीचे व इतर मसाला यांची गुणवत्ता वाढवणे त्याचबरोबर हळद आणि मसाला यांचा इम्पोर्ट एक्सपोर्ट मधील नफा आणि त्या संदर्भातील कंपन्या यांचे मार्गदर्शन केले. शासकीय योजनांची माहिती दिली.
प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुशांत पाटील यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.पूजा भोसले यांनी केले. आभार डॉ.श्रीनिवास बन्ने यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी, शेतकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0