शरद फार्मसीचे राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेत यश

Oct 30, 2026 - 18:07
 0  3
शरद फार्मसीचे राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेत यश

यड्राव : प्रतिनिधी

येथील शरद कॉलेज ऑफ फार्मसीमधील विद्यार्थींनींनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE), मुंबई यांच्या अंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय तांत्रिक प्रश्नमंजुषा स्पर्धेत उपविजेते पद पटकाविले. यामध्ये फैजा मूसा शिकलगार आणि सफिया महमद शेख ह्या सहभागी होत्या. 

महागाव येथील संत गजानन महाराज रूरल फार्मसी कॉलेजमध्ये ह्या स्पर्धा झाल्या. यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या गौरी फडके, प्रा. एस.आर. विठ्ठाणा यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0