टाकळी मध्ये सैनिकी शाळा व अद्यावत क्रीडांगण उभारणार - आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

आंदोलकांच्या शिष्टमंडळाला दिली ग्वाही

Aug 7, 2026 - 16:55
 0  33
टाकळी मध्ये सैनिकी शाळा व अद्यावत क्रीडांगण उभारणार -  आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

जयसिंगपूर : प्रतिनिधी

टाकळी गावची सैनिकी परंपरा पुढे नेण्यासाठी या गावात सर्व सोयींनी युक्त सैनिकी शाळा व युवकांच्या उत्तम आरोग्यासाठी अद्यावत असे क्रीडांगण उभारले जाईल यासाठीचे प्रस्ताव आपण राज्य शासनाकडे सादर करत असून स्थानिकांच्या या मुख्य मागण्या मान्य करण्यासाठी राज्य शासनाकडे आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली, औद्योगिक वसाहतीला विरोध करणाऱ्या आंदोलकांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली यावेळी ते बोलत होते, जवळपास सर्व तालुक्यांमध्ये शासकीय औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहेत, अनेक वर्षे झाली शिरोळ तालुक्यामध्ये अद्याप शासकीय औद्योगिक वसाहत नव्हती, टाकळी सारख्या परिसरात शासकीय औद्योगिक वसाहत निर्माण झाल्यामुळे टाकळी व परिसरातील अनेक गावांमधील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, महिलांसाठी होणाऱ्या गारमेंट क्लस्टर मुळे महिलांच्या हाताला देखील गावाशेजारी रोजगार उपलब्ध होणार आहे, ग्रामीण भागातील युवक उद्योजक व्हावा व रिकाम्या हातांना काम मिळावे हा या मागचा उद्देश आहे, त्यामुळे केवळ विरोधाला विरोध न करता या औद्योगिक वसाहतीला सहकार्य करावे अशी विनंती देखील आमदार यड्रावकर यांनी शिष्टमंडळाला केली, टाकळी हे आपल्या तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून मलाही त्याचा अभिमान असल्याचे आमदार यड्रावकर म्हणाले ,या औद्योगिक वसाहती मधून पाणी अथवा हवेच्या द्वारे प्रदूषण होईल असा एकही प्रकल्प उभारला जाणार नाही शून्य टक्के प्रदूषण होणारी ग्रीन औद्योगिक वसाहत असे या वसाहतीचे स्वरूप असेल या ठिकाणी स्थानिक बेरोजगार युवकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली, बऱ्याच वर्षानंतर शिरोळ तालुक्यात जनकल्याणकारी प्रकल्प येत आहे,

मुळात शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या आपल्या तालुक्यातील बेरोजगार युवकाला आपल्या अल्पशा जमिनीबरोबरच गावाशेजारीच रोजगाराचे एखादे साधन उपलब्ध झाले, त्याचबरोबर परिसरातील महिलांना गारमेंट उद्योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत असेल तर अशा सर्व कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावणार आहे, या परिवारामध्ये स्थैर्य निर्माण होऊन अनेक बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध होणार असल्याने शासनाच्या माध्यमातून उभी राहत असलेली ही औद्योगिक वसाहत शिरोळ तालुक्यासाठी आणि टाकळी व परिसरातील खेड्यांसाठी औद्योगिक प्रगतीचे वरदान ठरेल असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी सांगितले, बैठकीस आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील, राकेश जगदाळे, प्रकाश खोत त्यांचे सहकारी आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0