भरत बँकेची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील श्री भरत अर्बन को-ऑप बँक लि जयसिंगपूर या बँकेची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन डॉ.श्रीवर्धन एस. पाटील यांचे अध्यक्षतेखाली कल्पवृक्ष गार्डन जयसिंगपूर-सांगली रोड जयसिंगपूर येथे शनिवार दि. ०८/०८/२०२६ रोजी खेळीमेळीत संपन्न झाली प्रथमत: बँकेचे संचालक डॉ. किरण वि.अणुजे यांनी स्वागत केले. त्यानंतर संचालक पै. विठ्ठल बाबूराव मोरे यांनी विषयवार अहवाल वाचन केले सर्व विषयांना सभासदांनी टाळयांच्या गजरात एकमुखी मंजुरी दिली. बँकेच्या एकूण प्रगतीचा आढावा घेवून रिझर्व्ह बँकेच्या धोराणानुसार बँकेचा कारभार पारदर्शक चालत असलेने बँकेचा पाया भक्कम झाला असलेचे प्रतिपादन केले.
गतसालाच्या ठेवीमध्ये ३७ कोटी ६२ लाख १३ हजाराने वाढ होवून एकूण ठेवी रु.३१७ कोटी ४४ लाख इतक्या झाल्या तर कर्जामध्ये रु. ३४ कोटी ६८ लाख ७८ हजार ने वाढ होवून चालू आर्थिक सालात कर्जे रु. १९४ कोटी ७७ लाख ९१ हजार झाली आहेत. बँकेचा एन.पी.ए. ० टक्के व थकबाकी २.२० टक्के राहीली असून निव्वळ नफा १ कोटी ५८ लाख ८० हजार झाला आहे. यावेळी सभासदांना ९ टक्के दराने लाभांश देणेस सभासदांनी मंजूरी दिली.श्री भरत बँक सर्व सोई सुविधा देणारी व युपीआय सेवा देणारी शिरोळ तालुक्यातील पहीली सहकारी बँक असलेचे प्रतिपादन केले. तसेच बँकेस ऑडीट वर्ग “अ” मिळाल्याचे सांगून बँकेचा प्रगतीचा आढावा घेतला तत्पुर्वी उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन अहवाल सालात महराष्ट्र राज्याचे दिवंगत उप मुख्यमंत्री श्री.अजित पवार तसेच डॉ.डी. वाय.पाटील, कै.आशा भोसले यांचे तसेच ज्ञात अज्ञात निधन पावलेल्या व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण करणेत आली.
त्यानंतर बँकेचे चेअरमन डॉ. श्रीवर्धन एस. पाटील यांनी वाजीराव कवठेकर यांनी सुरवात केलेल्या सहकारास ब्रिटीश सरकारने मान्यता दिली व महाराष्ट्र सरकाने १९६० साली त्याचे कायद्यात रूपांतर केले. या कायद्या अंतर्गत स्थापन झालेल्या सहकारी बॅंकांचा एकुण बँकिंग क्षेत्रात वाटा जरी कमी असला तरी तळागाळातील गरजू व गरीब सामान्य लोकांच्या गरजा याच बॅंकांमार्फत अग्रक्रम व दुर्बल घटक म्हणून वित्त सहाय्य केले जाते. म्हणून आजच्या काळात सहकारी बॅंकांचे महत्व टिकून आहे.
त्यानंतर बँकेचे व्हा. चेअरमन श्री. प्रसन्न कुंभोजकर यांनी भरत मेडिकल ट्रस्ट व बँकेमार्फत देणेत यणा-या विविध पुरस्कार सोहळ्यास उपस्थित सर्वांचे स्वागत केले.
सदरवेळी श्री भरत अर्बन को-ऑप. बँक लि, जयसिंगपूर संचलित भरत मेडिकल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्यावतीने देणेत येणारा डॉ. एस. के. पाटील धन्वंतरी पुरस्कार गणेशवाडीचे प्रसिध्द धन्वंतरी डॉ. बाळासाहेव
खुवाण्णा देवताळे, डॉ. जे. जे. मगदूम समाजभूषण पुरस्कार श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र जयसिंगपूर चे व्यवस्थापक श्री.गोवर्धन दबडे व बँकेच्या वतीने देणेत येणारा श्री भरत रत्न पुरस्कार कृषी पत्रकार, संपादक, लेखक व प्रकाशक श्री. रावसाहेव पुजारी यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक मा. खासदार श्री राजू शेट्टी यांच्या शुभहस्ते देणेत आला. सदरवेळी पुरस्कार विजेत्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये कै. डॉ. एस. के.पाटील व कै. डॉ. जे. जे. मगदूम यांच्या सामाजीक वांधीलकी व सेवाभावी वृत्ती यास आदर्श मानून आजपर्यंत आपण मार्गकमण करित आहोत, त्यांच्या प्रभावामुळे आज आपणास हे यश मिळाल्याचे आधोरेखित केले. डॉ. देवताळे यांनी
सदरचा पुरस्कार आयुष्यभर स्मरणार्थ राहिल याची ग्वाही दिली तर श्री. गोवर्धन दबडे यांनी मिळालेल्या पुरस्कारास कसलेही गालवोट लागणार नाही याची खवरदारी पुढील आयुश्यात निश्चितच घेईन तसेच बँकेच्या नावातच भरत असलेने बँकेस नेहमीच आर्थिक भरती येत राहो अशी सदिच्छा व्यक्त केली.श्री.रावसाहेव पुजारी यांनी भरत बँक म्हणजे माझे घरच आहे आणि हा पुरस्कार मी घरचाच समजतो एका सामान्य शेतकरी शेतमजूर यांना नेहमीच मदत करणा-या कै. डॉ .एस.के. पाटील यांचा वारसा पुढील पिढीतील डॉ. श्रीवर्धन पाटील हे जपत आहेत.
यावेळी सांगलीचे प्रसिध्द रेडिऑलॉजिस्ट डॉ.नाटेकर यांनी आपल्या भाषणात आपण वयाने मोठे असून पश्चिम महाराष्ट्रातील पहिला रेडिऑलॉजिस्ट असून त्या काळी येणा-या रूग्णाकडे उपचाराचे पैसे नसताना देखील त्यांच्यावर उपचार करून मिळणारा आनंद म्हणजे वारीला पायी जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणे यात जो आनंद आहे तो आनंद मला मिळाला असे प्रतिपादन केले.
यानंतर कार्यकमाचे प्रमुख वक्ते सांगलीचे प्रसिध्द मानोसपचार तज्ञ डॉ. चारूदत्त कुलकर्णी यांनी श्रीमंतीकडून समृध्दिकडे जाण्याचा मार्ग प्रयत्न, यश, सुख, आनंद आणि समाधान याच्याशी निगडीत आहे.समाधान हे ४० टक्के माणसाच्या वृत्तीवर ३० टक्के भावनेवर व ३० टक्के स्वः प्रयत्नावर असते त्यामुळे मनुष्य प्राणी आपल्याकडे जे आहे त्यावरती लक्ष केंद्रित न करता अवाजवी अपेक्षा ठेवत असतो व मोहात वाहुन जातो त्यामुळे ताटर आपेक्षा न ठेवता अपेक्ष लवचिक ठेवाव्यात म्हणजे अपेक्षा भंग न होता समाधान मिळते.अध्यक्षीय भाषणामध्ये मा.खा.राजू शेट्टी यांनी डॉ.एस के.पाटील व डॉ.जे.जे.मगदूम यांनी तळहतावरील फोडाप्रमाणे बॅक जपली म्हणुनच आज वैद्यकीय भाषेत बोलायचे झालेस बँकेचे आरोग्य अत्यंत चांगले आहे. सभासद व सर्वसामान्य ग्राहकांना भरत बॅंक नेहमीच जिव्हाळ्याची व घरची वाटते. सामाजीक वांधीलकीमुळे समाजाचे आपण कहितरी देणे लागतो ही भावना ठेऊन समाजामध्ये निस्वार्थीपणे काम करणा-या व्यक्तींचा योग्य तो सन्मान वॅक नेहमीच करत आली आहे. आणि आजचे पुरस्कार विजेते हे या सन्मानास सर्वोतपरी पाञ असलेची खात्री या सन्माने झाली. डॉ.देवताळे यांचे कोरोणा काळातील कार्य श्री. रावसाहेब पुजारी यांचे शेती विषयक कार्य आणि श्री.दवडे यांनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रा मार्फत रुग्णांना मोफत जेवन, व्यसनमुक्ती तसेच अल्प दरात बाह्य रूग्ण सेवा या कार्याचा आवर्जुन उल्लेख श्री.शेट्टी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केला.
यावेळी पुरस्कार निवड समिती सदस्य डॉ.खटावकर,डॉ. कुरडे,डॉ.अक्कोळे,डॉ.अनिल पाटील,डॉ.अतिक पटेल व डॉ. धवल पाटील यांचा सत्कार करणेत आला. त्याचवरोवर १२ वी आर्टस, कॉमर्स व सायन्स मधील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला. यावेळी श्री. सावकर मादनाईक, श्री. शैलेश आडके, सौ.आसावरी आडके, डॉ. निता माने, डॉ. राजवर्धन पाटील MD.,श्री. धनाजी पाटील सावर्डेकर, श्री. प्रकाश बुचडे वडगाव यांचा यथोचित सत्कार करणेत आला. कार्यक्रमाच्या शेवटी बँकेच्या संचालकांनी सवचि आभार मानले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0