डॉ.जे.जे.सोसायटीत नूतन मानस्तंभ पूजन व शिलान्यास सोहळा संपन्न

Aug 17, 2026 - 17:35
 0  7
डॉ.जे.जे.सोसायटीत नूतन मानस्तंभ पूजन व शिलान्यास सोहळा संपन्न

जयसिंगपूर : प्रतिनिधी

     मौजे आगार ता. शिरोळ येथील डॉ.जे.जे.मगदूम हाऊसिंग सोसायटीमधील श्री.१००८ भगवान शीतलनाथ दिगंबर जिन मंदिर येथे नूतन मानस्तंभ पूजन व शिलान्यास सोहळा संपन्न झाला.यावेळी वीराचार्य वीरशिरोमणी ॲड. बाबासाहेब कूचनुरे यांच्या पुण्यतिथी निमित्त वीर सेवा दल व वीर महिला मंडळ यांच्या वतीने दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. 

      शिलान्यास व पुण्यतिथी सोहळा प.पू.108 मुनिश्री सारस्वतसागर,प.पू.108 मुनिश्री जयंतसागरजी महाराज व प.पू.108 मुनिश्री सिद्धसागर महाराज यांच्या पावन सानिध्यात संपन्न झाला. यावेळी सर्व मुनी महाराजांचे आशीर्वचन सर्व समाजाला मिळाले.मानस्तंभ शिलान्यास व पूजाविधी हे सर्व म्युनिश्री महाराजांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.  

      डॉ.विजय मगदूम (चेअरमन डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्ट) व ॲड.डॉ.सोनाली मगदूम ( व्हॉइस चेअरमन डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट) यांच्या शुभ हस्ते शिलान्यास पूजन व धार्मिक विधी करण्यात आले. शिक्षण महर्षी स्वर्गीय डॉ.जे.जे.मगदूम व डॉ.प्रभा जे. मगदूम या माता पित्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ.विजय मगदूम व परिवाराकडून मानस्तंभ उभारणी व आहारासाठी संपूर्ण योगदान देण्यात आले. हा विधी प्रतिष्ठाचार्य श्री.महावीर पंडित यांच्याकडून करण्यात आला.

     तत्त्वपूर्वी सर्व मुनीचे आगमन श्री.महावीर सोसायटीतील कमानी जवळ झाले.सर्व मुनीश्रीची पाद्य पूजा चेअरमन व महावीर सोसायटी सभासद यांच्या हस्ते करून, सवाद्य, मोठ्या उत्साहात, जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली.

    डॉ.जे.जे.मगदूम सोसायटी व परिसरातील सर्व श्रावक,श्राविका,वीर सेवा दल, वीर महिला मंडळ,श्री.1008 भगवान महावीर दिगंबर जैन ट्रस्टचे सर्व ट्रस्टी,स्वाध्याय मंडळ, वीराचार्य पाठशाळा या सर्वांचा सहभाग होता.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0