डॉ. मगदूम इंजिनिअरिंगमध्ये ‘प्लेसमेंट डे' उत्साहात : शेकडो विध्यार्थ्यांचे कौतुक

Jun 8, 2026 - 11:59
 0  1
डॉ. मगदूम इंजिनिअरिंगमध्ये ‘प्लेसमेंट डे' उत्साहात : शेकडो विध्यार्थ्यांचे कौतुक

जयसिंगपूर : प्रतिनिधी 

 डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत प्लेसमेंट डे उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री. ह्रिषीकेश धांडे (डेप्युटी डायरेक्टर,पुणे इंटरनॅशनल सेंटर, माजी रीजनल हेड : अकॅडमिक अलायन्सेस ग्रुप, TCS) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षात प्लेसमेंट मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी ‘Placement Waves– 2K26’ या नावाने हा विशेष कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला. टी.सी.एस.,इन्फोसिस, यझाकि इंडिया, इंडोव्हन्स,एस.जे.कॉन्ट्रॅक्ट्स, हिडन ब्रेन्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. सरासरी वार्षिक रु. तीन लाख पासून ७.५ लाख रुपये वेतन पॅकेज मिळाले.

       डॉ. जे. जे. मगदूम महाविद्यालयास ३४ वर्षाची शैक्षणिक परंपरा असून २०२६-२७ मध्ये शंभर टक्के प्लेसमेंटचे आपले ध्येय आहे, असे प्रतिपादन चेअरममन डॉ. विजय मगदूम यांनी केले. श्री. ह्रिषीकेश धांडे व त्यांच्या पत्नी सौ. मधुरा धांडे (सहाय्यक उपाध्यक्ष, डॉइचे बँक,जर्मन) यांच्या उपस्थिती बद्दल चेअरमन यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

  विद्यार्थ्यांनी योग्य आहारासोबत दररोज योग साधना, पुस्तक, वर्तमानपत्र वाचन आणि करमणूक या गोष्टी जोपासल्या पाहिजेत असे असे सांगून करिअर विषय मार्गदर्शन केले. उद्योग क्षेत्रातील संधी, आवश्यक कौशल्ये आणि करिअर विकासाविषयी श्री. धांडे यांनी मार्गदर्शन केले. १५० हून अधिक विद्यार्थिनी नोकरीच्या संधी खेचून आणल्याबद्दल अभिनंदन केले.

      कार्यकारी संचालक डॉ. एस. एस. आडमुठे, प्राचार्या डॉ. एस. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर श्री. सौरभ खानावळे यांनी ट्रेनिंग प्लेसमेंट प्रतिनिधी यांच्या सहकार्याने हा सोहळा आयोजन केले. यावेळी सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0